जगण्याचा आशावाद 

Arati chabria short film
Arati chabria short film

सध्या विविध विषयांवर लघुपट बनत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये या व्यासपीठाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे लघुपटांकडे बॉलीवूड व मराठी कलाकारांचा कलही वाढताना दिसतोय. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्‍ट लार्ज शॉर्ट फिल्म्सअंतर्गत "अहल्या', "नयनतारा नेकलेस', "इंटेरियर कॅफे', "चटणी', "आऊच' यांसारखे दमदार लघुपट त्यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दाखल केले आहेत. आता जीवनातील प्रत्येक क्षण उत्साहाने जगणे व आनंद घेणे का महत्त्वाचे आहे यावर आधारित लघुपट त्यांनी बनवलाय. या लघुपटाचे नाव आहे "मुंबई वाराणसी एक्‍स्प्रेस'. हा लघुपट राजाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रवास दर्शवतो आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे का महत्त्वाचे आहे याची माहिती देतो. यात दर्शन जरीवाला, शेखर शुक्‍ला व विवेक सिंग हे कलाकार मुख्य भूमिकांत आहेत. या लघुपटाचे दिग्दर्शन आरती छाब्रिया हिने केलेय. तिने याबद्दल सांगितले की, मुंबई वाराणसी एक्‍स्प्रेसची कथा ही आजच्या आपल्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. जिथे आपण सर्व जण यशस्वी होण्याकरिता सतत स्पर्धेच्या मागे धावत आहोत. मात्र, यादरम्यान आपण आपले जीवन व त्याचा आनंद घेण्यास विसरलो आहोत. मला वाटते की अनेकांना हा लघुपट आपलासा वाटेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com