अरुण नलावडे दिग्दर्शकाच्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

हरहुन्नरी अभिनेते अरुण नलावडे दिग्दर्शनाची नवी भूमिका निभावणार आहेत. शरयू आर्ट प्रॉडक्‍शननिर्मित "ताटवा' या चित्रपटाचे दिग्दर्शन ते करीत आहेत. या चित्रपटात पाथरवट समाजातील होतकरू एका मुलीचा जीवनप्रवास चित्रित केला आहे. या मुलीला शिल्पकलेचे प्रशिक्षण देणाऱ्या शिल्पकाराच्या व्यक्तिरेखा नलावडे साकारणार आहेत. म्हणजे, या चित्रपटात ते अभिनेता आणि दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतील. याबाबत ते म्हणाले की, "मी या चित्रपटात फक्त एक व्यक्तिरेखा साकारणार होतो; मात्र निर्मात्या डॉ. शरयू पाझारे यांनी तुम्ही या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार का? असे विचारले. विषयात नाविन्य असल्याने मी तयार झालो.' 

Web Title: arun nalavade director