भूमिकेसाठी 'डिटेक्‍टिव्ह'चीच भेट

भूमिकेसाठी 'डिटेक्‍टिव्ह'चीच भेट
भूमिकेसाठी 'डिटेक्‍टिव्ह'चीच भेट

ती एक अतिशय खंबीर स्त्री असून तिचे धारदार निरीक्षण, तर्कसंगती आणि बारकाव्यांकडे तिने आजतागायत अनेक सीरिअल किलर्स, गुन्हेगार, दिल्लीच्या अंधाऱ्या भागांतील गॅंगस्टर्सना पकडून दिले आहे. आपल्या घरची कामे सांभाळून ती परिवाराचीही काळजी घेते. तिचे नाव आहे बंटी शर्मा अर्थात 'डिटेक्‍टिव्ह दीदी' जिला आपल्या शहराला गुन्हेगारांपासून वाचविण्याची गरज वाटते. 'डिटेक्‍टिव्ह दीदी'ची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनिया बालानी हिने नुकतीच भारतातील पहिली स्त्री डिटेक्‍टिव्ह रजनी पंडित यांची या भूमिकेच्या तयारीसाठी भेट घेतली. त्यांच्यासोबत सोनियाने दिवस घालविला. त्यामुळे तिला एका डिटेक्‍टिव्हच्या आयुष्याबद्दल काही रोचक गोष्टी माहिती झाल्या. अर्थातच आपली व्यक्तिरेखा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तिला यामुळे खूपच मदत झाली.
सोनिया म्हणाली, ''बंटी शर्मा ही माझ्या सर्वांत कठीण भूमिकांपैकी एक आहे. आज रजनीजींसोबत चर्चा करण्याचा छान अनुभव होता. त्यांनी दिलेल्या टिप्स मला व्यक्तिरेखा साकारताना निश्‍चितच कामी येतील.''

'बॉलिवूड' प्रस्थापितांचे नव्हे सर्वांचेच
हिंदी चित्रपटसृष्टीत काही मोजक्‍या निर्माता-दिग्दर्शकांच्या मर्जीनुसारच कामे होतात, अशी चर्चा गेले काही महिने सुरू आहे. या मोजक्‍या आणि प्रभावशाली निर्माता-दिग्दर्शकांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनाच या क्षेत्रात कामे मिळतात, असे सांगितले जात असले, तरी अभिनेता श्रेयस तळपदे याचे मत काहीसे भिन्न आहे.
'इक्‍बाल', 'डोर' अशा विविध चित्रपटांमधून लक्षणीय भूमिका करून श्रेयसने या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टी ही सर्वांची असून ज्यांच्या अंगात अभिनयगुण आहेत, अशा सर्वांचे ती मोकळ्या हाताने स्वागत करते, असे त्याचे मत आहे. हिंदी चित्रपटसृष्टी ही प्रस्थापित निर्माते-दिग्दर्शक किंवा अभिनेत्यांपुरती मर्यादित नाही. मी त्याचं एक जिवंत उदाहरण असल्याचंही श्रेयस सांगतो.
करण जोहर आणि रोहित शेट्टी यांच्या आगामी कार्यक्रमाबद्दल श्रेयस म्हणाला, ''या भावी सुपरस्टार्सना माझ्या शुभेच्छा. हे दोन कलाकार तुमची कठोर परीक्षा घेतील आणि ती तुमच्या भल्यासाठीच असेल.''

ट्‌विंकल देणार विनोदाच्या टिप्स
'मिसेस फनीबोन्स' या टोपणनावाने नर्म विनोदी लेखन करणारी अभिनेत्री ट्‌विंकल खन्ना हिचे ' मिसेस फनीबोन्स' नावाचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर तिच्या लोकप्रियतेत भरपूर वाढ झाली. आता 'खिचडी' या मालिकेच्या पटकथेत काही विनोदी पैलू पाडण्यासाठी निर्मात्यांनी तिच्याकडून काही सूचना मागविल्याची चर्चा सुरू आहे. मूळ अभिनेत्री असलेली आणि आता लेखिका बनलेली ट्‌विंकल ही स्वत: 'खिचडी' या मालिकेची मोठी चाहती आहे आणि त्यामुळे तिने काही विनोदी किस्से वा प्रसंग द्यावेत, अशी सूचना निर्मात्यांनी तिच्याकडे केल्याचे समजते. ट्‌विंकल या मालिकेत दिसणार नसली, तरी तिने सुचविलेले संवाद, प्रसंग वा तत्सम सूचनांचा समावेश पटकथेत केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com