अभिनय-आर्याच्या गप्पांचाही जुळला सूर! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

एक आगळीवेगळी प्रेमकथा असलेला"ती सध्या काय करते' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांशी ट्विटरवर लाईव्ह चॅट करण्यासाठी चित्रपटाचे नवोदित कलाकार अभिनय बेर्डे अन्‌ आर्या आंबेकर टीम "सकाळ'च्या परळ कार्यालयात आली होती. करिअर, चित्रपट, गाणे, कॉलेज, कुटुंब, नव्या वर्षाचा संकल्प आदी अनेक विषयांवर 
त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या... 

एक आगळीवेगळी प्रेमकथा असलेला"ती सध्या काय करते' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांशी ट्विटरवर लाईव्ह चॅट करण्यासाठी चित्रपटाचे नवोदित कलाकार अभिनय बेर्डे अन्‌ आर्या आंबेकर टीम "सकाळ'च्या परळ कार्यालयात आली होती. करिअर, चित्रपट, गाणे, कॉलेज, कुटुंब, नव्या वर्षाचा संकल्प आदी अनेक विषयांवर 
त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या... 

मी अजूनही तिला फोन करून विचारतो की"ती काय करते?' तिच्याशी नेहमीच बोलणं होत असतं, असं म्हणत दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे दिलखुलासपणे हसला. माझा तानपुरा माझी नेहमीच वाट बघत असतो, असं म्हणत रियाजावर आपला किती भर असतो, हे आर्या आंबेकरने सांगितले. दोन्ही कलाकार नवे असले तरी त्यांची क्रेझ दिसून आली. दोघांना प्रश्‍न विचारण्यासाठी ट्विटरकरांची चढाओढ सुरू होती. मी कधीच नवीन वर्षाचा संकल्प करत नाही. कारण तो पूर्ण होत नाही; पण नवीन वर्षाची सुरुवात मी रियाजानेच करते, असे आर्याने सांगितले. एकीकडे सगळी दुनिया नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष करत असते; पण आर्या मात्र रियाज करत असते, असे अभिनय मिश्‍कीलपणे म्हणाला. दोघांनी खेळकरपणे प्रश्नांना उत्तरे दिली. तो म्हणाला की, मलाही आता अभ्यासाकडे लक्ष द्यायचे आहे. मी दररोज किमान दोन तास अभ्यास करणार आहे. नववर्षाचा संकल्प मी केला आहे. सध्या कला शाखेतील पदवी अभ्यासक्रमात मी शिकत असून अर्थशास्त्र हा माझा विषय आहे; पण आर्याने अर्थशास्त्रातून पदवी घेतली म्हणून मी हे शिक्षण घेत नाही. ती मला उशिरा भेटली आहे, असे म्हणत त्याने पुन्हा तिची फिरकी घेतली. दोघांचेही चांगले ट्युनिंग जमल्याचे सतत जाणवत होते. अभिनय अधूनमधून "लक्ष्या'स्टाईल केसांवरून हात फिरवत होता. आऱ्याही त्याच्या मिश्‍कील स्वभावामुळे चांगली खुलली होती. दोघांनीही चित्रपटात अभिनयाबरोबरच गाणेही गायले आहे. दोघांचाही सूर 
चांगला जुळला असल्याचे त्यांच्या खेळकर अन्‌ खोडकर गप्पांमधून दिसून आले. 

कुटुंबाचा आधार 
आता मी मोठा झालोय. त्यामुळेच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आई आता जास्त डोकावत नाही. मी दमलेला असतो, हे आईही पाहत असते. त्यामुळे ती जास्त चौकशी करत नाही; पण मला नक्कीच तिचा आधार आहे. लक्ष्मीकांत बेर्डे हे माझे बाबा. त्यांची आठवण चित्रीकरण सुरू असताना सतीश राजवाडे यांच्याशी बोलताना नेहमीच निघायची."बनवाबनवी' 
चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही बोलायचो. चित्रपटाचा प्रोमो रीलिज झाला तेव्हा मला बाबांची खूप आठवण आली, असे म्हणताना अभिनय भावुक झाला. 

कितीही दमले तरी बाबांशी बोलणारच 
रात्रीचे कितीही वाजलेले असले तरी मला बाबांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, असे आर्याने सांगितले. बाबा आणि मी कितीही दमलेलो असलो तरी दिवसभर मी काय काय केलं, हे त्यांना कंटाळा येईपर्यंत मी फोनवर सांगत असते, असे ती म्हणाली. 

उदंड प्रतिसाद! 
अभिनय आणि आर्याच्या प्रेमात तरुणाई आताच किती आकंठ बुडाली आहे, हे गप्पांच्या वेळी दिसून आले. ट्विटरवर अनेक युजर्सनी अभिनय आणि आर्यावर प्रश्नांचा वर्षाव केला. 
दोघांचे कौटुंबिक जीवन, करिअर,आवडी निवडी, आगामी चित्रपट, छंद, नवीन वर्षातील संकल्प आदींविषयी ट्विटरवर अनेक प्रश्‍न रसिकांनी विचारले. एका तासात तब्बल 12 हजार 
इम्प्रेशन्स चर्चेला मिळाले. 

 

Web Title: Arya-Abhinay match form chat! ti sadhya kay karte team