अशोक मामा "शेंटिमेंटल' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

आजपर्यंत विविधरंगी व्यक्तिरेखा साकारणारे आणि मराठी इंडस्ट्रीत "अशोक मामा' म्हणून लोकप्रिय असलेले अशोक सराफ यांचा वाढदिवस 4 जूनला साजरा करण्यात आला आणि याच मुहूर्तावर त्यांच्या आगामी "शेंटिमेंटल' या चित्रपटाची एका अनोख्या पद्धतीने घोषणा करण्यात आली.

"पोस्टर गर्ल', "पोस्टर बॉईज' या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक समीर पाटील यांनी "शेंटिमेंटल'ची घोषणा केली. हा क्षण अशोक सराफ यांच्यासाठी खरंच सेंटिमेंटल होता, कारण 1975 मध्ये त्यांनी करिअरची सुरुवात "पांडू हवालदार'पासून केली होती आणि या चित्रपटाच्या पोस्टरवर हवालदाराच्या पोषाखातील अशोक मामांचे चित्र होते. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना मेंटल करण्यासाठी 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे.