चर्चा अश्विनी भावे यांच्या फोटोशूटची

टीम ई सकाळ
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

मुंबई : नुकतंच अश्विनी भावे यांनी एक फोटोशूट केलं आणि त्यातला एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोला प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद देखील मिळत आहे. फोटोमध्ये त्या खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. असे सौंदर्य जे आजच्या तरुण अभिनेत्रींना ही लाजवेल. त्यांनी परधान केलेला लाल कलरचा गाऊन हा तिच्या सौंदर्यामुळे अजूनच खुलून येत आहे.

त्यांच्या या ग्लॅमरस फोटो टाकण्यामागे काय कारण हे अजून कोणालाच माहित नाही पण त्यांचा असा फोटो पाहून सर्वच तरुण अभिनेत्रींच्या भुवया उंचावल्या आहेत हे नक्कीच. वयाला लाजवणारे असे अद्वितीय सौंदर्य फोटोला अजूनच सुंदर बनवत आहे. या फोटोला पाहून अनेक तर्क येत आहेत ते म्हणजे अश्विनीचा नवीन चित्रपट येत आहे का?? कि त्या काही नवीन उपक्रम करणार आहे?? काहीच कळायला मार्ग नाहीये आणि म्हणूनच सर्वच त्यांच्या पुढच्या वाटचालीकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्यावरचा पडदा अश्विनीच हटवू शकतात म्हणूच आता आपल्याकडे त्याची वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नाही. तर वाट पाहूया नक्की काय पाहायला मिळेल याची.