'बाहुबली'ची जगभरात 1000 कोटींची कमाई

वृत्तसंस्था
रविवार, 7 मे 2017

'बाहुबली- द कन्क्‍लुजन'ने भारतात 800 कोटींची आणि परदेशात 200 कोटींची कमाई केली आहे. अजूनही सर्व शो हाऊसफुल्ल असून, कमाईचा आकडा 1500 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

मुंबई - दिग्दर्शक राजामौली यांच्या 'बाहुबली- द कन्क्‍लुजन' या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींची कमाई करत इतिहास रचला. 'बाहुबली- द कन्क्‍लुजन'ने प्रदर्शनानंतर नवव्या दिवशीच ही कमाई केली आहे.

जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रसिकांनी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. देशात केवळ दक्षिणेकडीलच नाही, तर देशभरातील अनेक चित्रपटगृहांना अतिरिक्त खेळाचे आयोजन करावे लागत आहे. एकाच वेळी सर्वाधिक पडद्यांवर दाखविला जाण्याचा विक्रमही 'बाहुबली- द कन्क्‍लुजन'ने आपल्या नावावर केला आहे. 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' याबाबत गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांमध्ये उत्सुकता होती. कलाकारांच्या अभिनयाबरोबरच चित्रपटात वापरल्या गेलेल्या "व्हीएफएक्‍स' तंत्रज्ञानामुळेही हा चित्रपट आवडल्याचे चित्रपटप्रेमींनी सांगितले. 

अतिशय भव्य-दिव्य मांडणीमुळे हॉलिवूडच्या तोडीस तोड चित्रपट झाल्याची भावना व्यक्त होत आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडविणार हे निश्‍चित होते. रमेश बाला यांनी कमाईबाबत ट्विट करताना सांगितले, की 'बाहुबली- द कन्क्‍लुजन'ने भारतात 800 कोटींची आणि परदेशात 200 कोटींची कमाई केली आहे. अजूनही सर्व शो हाऊसफुल्ल असून, कमाईचा आकडा 1500 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या "बाहुबली द बिगिनिंग' हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 650 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. भारतातील एवढी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला होता. आता त्याचा दुसरा भाग त्यापेक्षाही जास्त कमाई करत आहे.

मनोरंजन

मुंबई : सध्या जुली 2 या चित्रपटामुळे राय लक्ष्मी भलतीच चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या नावाची अशीच चर्चा झाली होती, कारण...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई : काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीत एेतिहासिक आरके स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी या घडल्या घटनेबद्दल...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017