कंगना बघणार बाहुबली- 2 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

कंगना राणावत आणि प्रभास ही जोडी पक्त एका सिनेमासाठी बनली होती. याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? पण जर तुम्ही प्रभासचे हीट आणि फ्लॉप दोन्ही चित्रपट पाहिले असतील तर तुम्हाला ही जोडी माहीत असेल.

कंगना "क्वीन' आणि प्रभास "बाहुबली' बनण्याच्या आधी या दोघांनी एकत्र एक चित्रपट केला होता. त्याचं नाव होतं "एक निरंजन'. या चित्रपटात नेहमीसारखीच लव्हस्टोरी होती. हा चित्रपट फारसा चालला नाही. पण या दोघांचं या चित्रपटावेळी खूपच भांडणं होत असतं. मग त्यांची भांडणं इतकी टोकाला पोहोचली की त्यांनी एकमेकांचं तोंडही न बघण्याचा निर्णय घेतला.

पण जेव्हा "बाहुबली'चा पहिला भाग आला आणि प्रभासने या चित्रपटातून ग्रॅण्ड एन्ट्री घेतली तेव्हा कंगनाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला- "वॉव!' नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कंगनाने सांगितलं की, "प्रभासला एवढं यशस्वी झालेलं पाहून मला खूप आनंद होतोय. आम्ही एका मोठ्या भांडणानंतर एकमेकांशी बोलणंच बंद केलं होतं. पण त्याचे "बाहुबली'चे दोन्हीही भाग पाहून मला खूप आनंद झालाय. मला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि मी "बाहुबली 2' लवकरच बघणार आहे.'