ई सकाळ FB #Live - आज दुपारी 2 वाजता भेटणार 'बापजन्म'ची टीम

गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

निपुण धर्माधिकारी याने दिग्दर्शित केलेला बापजन्म हा चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असून, दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेता पुष्कराज चिरपुटकर या चित्रपटातून पदार्पण करतोय. या चित्रपटाची टीम ई सकाळच्या वाचकांशी गप्पा मारण्यासाठी येते आहे. आज, गुरूवारी दुपारी 2 वाजता.

पुणे : निपुण धर्माधिकारी याने दिग्दर्शित केलेला बापजन्म हा चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असून, दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेता पुष्कराज चिरपुटकर या चित्रपटातून पदार्पण करतोय. या चित्रपटाची टीम ई सकाळच्या वाचकांशी गप्पा मारण्यासाठी येते आहे. आज, गुरूवारी दुपारी 2 वाजता. 

निपुण धर्माधिकारी, पुष्कराज आणि सचिन खेडेकर अशी मंडळी या लाईव्ह शोमध्ये भाग घेतील. यापूर्वी कच्चा लिंबू या चित्रपटावेळी सचिन यांनी ई सकाळच्या फेसबुक लाईव्हमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील एक कविताही सादर केली हाेती. आता बापजन्म हा चित्रपट नेमका काय आहे, तो कशावर भाष्य करतो आदी बाबींवर या गप्पांमध्ये चर्चा होईल. त्याचवेळी नाटक, वेबसिरीज आणि चित्रपट ही तीनही माध्यमे निपुणने उत्तम हाताळली आहेत. तर यावरही त्याला प्रश्न विचारता येतील. 

ई सकाळच्या व्हेरिफाईड फेसबुक पेजवरून हा लाईव्ह शो आपल्याला पाहता येईल. तुम्ही त्यांना तुमच्या मनातले प्रश्नही विचारू शकता. वेळ लक्षात ठेवा आज, दुपारी 2 वाजता.