पहलाज निहलानींना बनवायचा आहे बाबरी मशीद पाडकामावर चित्रपट

babari masjid demolition subject for movie pahalaj nihlani esakal news
babari masjid demolition subject for movie pahalaj nihlani esakal news

मुंबई : सेन्साॅर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आता दरवेळी नवनवे खेळ खेळायला सुरूवात केली आहे. जाणूनबुजून चर्चेत राहण्यासाठी ते सातत्याने नवी विधाने करताना दिसतात. त्यातच आता वादग्रस्त असा बाबरी मशिद पाडकामावर बेतलेला चित्रपट आपण लवकरच बनवू अशी घोषणा त्यांनी करून नवा वाद ओढवला आहे. नुसता विषय जाहीर करून गप्प बसले असते तर ते पहलाज कसे.. त्यामुळे मी चित्रपट बनवणार असून मी कोणत्याही पक्षाला घाबरत नाही. जे सत्य आहे ते मी मांडणारच भले ते कितीही कटू का असेना असंही सांगून नव्या वादाची शक्यता स्वत: वर ओढवून घेतली आहे.

याबद्दल पहलाज यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या मनात या विषयावर चित्रपट बनण्याचा विचार होता. फक्त दरम्यानच्या काळात मलाा वेळ मिळत नव्हता. आता मी पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीला आणि वितरणाला सुरूवात केली आहे. जुली 2 हा  चित्रपट मी वितरित करत आहेच. शिवाय, आता मात्र मी बाबरी मशिद प्रकरणावर चित्रपट बनवणार आहे. जे सत्य आहे ते आहे. ते कितीही कटू असलं तरी ते मी मांडणारच. भाजपच्या धोरणानुसार जर मी चित्रपट बनवला नाही तर तो प्रदर्शित होऊ देणार नाही असंही मला सांगण्यात आलं. पण मी कुणालाही घाबरत नाही. या देशातल्या या लोकांनी आता कुणालाही घाबरू नये. मीही सत्याला घाबरत नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com