बाहुबली आणि दंगल यांची तुलना होऊ नये

टीम ई सकाळ
शुक्रवार, 26 मे 2017

बाहुबली आणि दंगल हे दोन्ही सिनेमे आपआपल्या मेरीटवर लोकप्रिय ठरले. दोन्ही सिनेमांचा बाज वेगळा आहे. त्यामुळे मी तरी या दोन्ही सिनेमांची तुलना करत नाही. आणि ती करूच नये असे मला वाटते, असे स्पष्ट मत अभिनेता, निर्माता आमीर खान याने व्यक्त केले.

मुंबई : बाहुबली आणि दंगल हे दोन्ही सिनेमे आपआपल्या मेरीटवर लोकप्रिय ठरले. दोन्ही सिनेमांचा बाज वेगळा आहे. त्यामुळे मी तरी या दोन्ही सिनेमांची तुलना करत नाही. आणि ती करूच नये असे मला वाटते, असे स्पष्ट मत अभिनेता, निर्माता आमीर खान याने व्यक्त केले. 

गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही सिनेमांच्या कमाईवरून तुलना केली जात आहे. दंगलने 300 तर बाहुबली 2 ने दीड हजार कोटीची कमाई केली. तर चीनमध्ये रिलीज झालेल्या दंगलनेही तिकडे 600 कोटींची कमाई केल्याचे वृत्त आहे. सातत्याने होणार्या या तुलनेवर आमीर खान पहिल्यांदाच बोलला. यावर बोलताना तो म्हणाला, 'या दोन्ही सिनेमांची तुलना का होतेय ते मला कळत नाहीय. कारण दोन्ही सिनेमे वेगळे आहेत. कमाईमध्ये बाहुबलीची दंगलवर मात अशा बातम्या पाहून मला कमाल वाटते.'