बालक पालकमधला अव्या परत येतोय!

टीम इ सकाळ
बुधवार, 28 जून 2017

रवी जाधव दिग्दर्शित 'बालक पालक' या सुपरहिट चित्रपटामधील मधील अव्याचं अभ्यासू पात्र साकारणारा बालकलाकार रोहित फाळकेने त्याच्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातली, त्याने वठवलेल्या भूमिकेची वाहवाही झाली. रोहित त्यानंतर स्टार प्रवाहवरील ‘बे दुणे दहा’ या मालिकेतून बापट या पात्राद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याचसोबत रोहितला प्रेक्षकांनी जाहिरातींमध्ये देखील पाहिले आहे.

मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित 'बालक पालक' या सुपरहिट चित्रपटामधील मधील अव्याचं अभ्यासू पात्र साकारणारा बालकलाकार रोहित फाळकेने त्याच्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातली, त्याने वठवलेल्या भूमिकेची वाहवाही झाली. रोहित त्यानंतर स्टार प्रवाहवरील ‘बे दुणे दहा’ या मालिकेतून बापट या पात्राद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याचसोबत रोहितला प्रेक्षकांनी जाहिरातींमध्ये देखील पाहिले आहे.

शाळेत असल्यापासून रोहित हा थिएटरमध्ये निपुण आहे. रोहितला बालक पालकमध्ये बालकलाकार म्हणून पाहिल्यानंतर आता मांजा चित्रपटामधील रोहितची हटके भूमिका बघणे रंजक ठरेल. मांजा या चित्रपटात रोहित ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यासोबत सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटामुळे अश्विनी भावे सारख्या मात्तबर अभिनेत्री सोबत काम करण्याची संधी रोहितला मिळाली. रोहितसोबत सुमेध मुद्गलकरही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.

जतीन वागळे दिग्दर्शित मांजा हा चित्रपट २१ जुलै रोजी जागतिक पातळीवर प्रदर्शित होणार आहे.पहिल्यांदाच त्रिलोक मल्होत्रा आणि के. आर. हरीश या हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी या चित्रपटाची इंडिया स्टोरीज या बॅनरखाली निर्मिती केली असून MFDC या कंपनीने हा सिनेमा प्रस्तुत केला आहे. नितीन केणी आणि मनीष वसिष्ट यांची MFDC हि कंपनी मराठी चित्रपट निर्मिती आणि वितरण या क्षेत्रात कार्यरत आहे.