मराठमोळी रीना "बेहेन होगी तेरी' 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला "झाला बोभाटा' या चित्रपटातील अभिनेत्री रीना अगरवाल आता "बेहेन होगी तेरी'मध्ये श्रुती हसन आणि राजकुमार राव यांच्यासह झळकणार आहे. 
अजय के. पन्हालाल दिग्दर्शित "बेहेन होगी तेरी' या रोमॅंटिक कॉमेडीचे चित्रीकरण लखनौला सुरू आहे. या चित्रपटात बिग बॉस फेम गौतम गुलाटी यानेही एक व्यक्तिरेखा साकारली आहे. 
रीनाने आमीर खानच्या "तलाश'मध्ये पोलिस हवालदाराची व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच छोट्या पडद्यावरील हिंदी मालिका "एजंट राघव'मध्येही तिने काम केले आहे. "अजिंठा' या मराठी चित्रपटाद्वारे तिने या क्षेत्रात प्रवेश केला.  