अक्षयला राष्ट्रीय पुरस्कार; 'नीरजा', 'कासव', 'दशक्रिया' ठरले सर्वोत्कृष्ट

टीम ई सकाळ
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदीतील 'नीरजा', तर मराठीतील 'कासव'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 'कासव'ला 'सुवर्णकमळ' मिळाले आहे. सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतीच 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार 'दंगल'मधील झायरा वासिम हिला मिळाला आहे. जम्मू-काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्याने चर्चेत आली होती. 

विमानाचे अपहरण झालेले असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून दहशतवाद्यांना थोपवून ठेवत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविणारी हवाईसुंदरी नीरजा भानोत हिच्या जीवनावर आधारित नीरजा चित्रपटात नायिकेची भूमिका सोनम कपूरने साकारली आहे. 

रुस्तम या नानावटी खटल्यावर बेतलेल्या चित्रपटात अक्षय कुमारने नौदलातील अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. परपुरुषाने आपल्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर त्याला मारून टाकणारा ‘रुस्तम’ आणि त्याच्यातील देशभक्त हा या चित्रपटाचा विषय आहे.

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा पुरस्कार 'शिवाय'ला मिळाला. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पुरस्कार 'दशक्रिया'साठी मनोज जोशीने पटकावला. व्हेंटिलेटरला सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंगचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार 'धनक'ला मिळाला आहे.

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) : कासव
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता : अक्षय कुमार (रुस्तम)
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : मनोज जोशी (दशक्रिया)
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : झायरा वासिम (दंगल)
 • सर्वोत्कृष्ट पटकथा : दशक्रिया
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा : सायकल
 • सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग : व्हेंटिलेटर
 • सर्वोत्कृष्ट संकलन : व्हेंटिलेटर
 • सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : पिंक
 • झारखंडला विशेष पुरस्कार
 • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : धनक
 • स्पेशल इफेक्ट्स : शिवाय