भरत अणि डाॅ. ओक म्हणणार 'वेलकम जिंदगी' 

टीम ई सकाळ
गुरुवार, 8 जून 2017

'श्रीमंत दामोदरपंत', 'सही रे सही' अशा नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता भरत जाधव आता नव्या नाटकानिशी परत येतोय. या नव्या नाटकाचे नाव 'वेलकम जिंदगी' असून यात त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहेत, 'कुसुम मनोहर लेले', यू टर्न' अशा नाटकातून दिसलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक. या नाटकाचे दिग्दर्शन राजन ताम्हाणे करत असून, हे नाटक गुजराती लेखक सौम्य जोशी यांनी लिहिले आहे. 

पुणे : 'श्रीमंत दामोदरपंत', 'सही रे सही' अशा नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता भरत जाधव आता नव्या नाटकानिशी परत येतोय. या नव्या नाटकाचे नाव 'वेलकम जिंदगी' असून यात त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहेत, 'कुसुम मनोहर लेले', यू टर्न' अशा नाटकातून दिसलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक. या नाटकाचे दिग्दर्शन राजन ताम्हाणे करत असून, हे नाटक गुजराती लेखक सौम्य जोशी यांनी लिहिले आहे. 

या नाटकाची निर्मिती त्रिकूट ही नाट्यसंस्था करत असून हे नाटकाची रंगभूषेची जबाबदारी विक्रम गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या नाटकाची लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. याबद्दल माहिती देताना दिग्दर्शक राजन ताम्हाणे म्हणाले, हे नाटक दोन वर्षांपूर्वी मी गुजरातीमध्ये पाहिले होते. त्यावेळेपासून मला ते मराठीत करायचे होते. सौम्य आणि माझा परिचय आहेच. त्याला माझे प्रपोजल हे नाटक आवडले होते. मग बार्टर सिस्टिममध्ये आम्ही आमची नाटके एकमेकाला दिली. आता हे वेलकम जिंदगी हे नाटक मी आणि शेखर ताम्हाणे करत असून यात भरत जाधव आणि गिरीश ओक पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील. 

या नाटकाच्या नेपथ्याची धुरा प्रदीप मुळ्ये यांच्याकडे असून रंगभूषेची जबाबदारी विक्रम गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हे नाटक यायला अद्याप वेळ असून दसऱ्याच्या मुहूर्तावर या नाटकाचा पहिला प्रयोग दिनानाथ नाट्यगृह येथे होणार आहे.