मास्टरजी के लिये कुछ भी!! 'भिकारी'च्या गाण्यावर थिरकते बाॅलिवूड

टीम ई सकाळ
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

गणेश आचार्य, म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले लाडके व्यक्तिमत्व ! अश्या या लाडक्या व्यक्तीमत्वाने दिग्दर्शित केलेल्या 'भिकारी' सिनेमाच्या गाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे, नुकतेच प्रदर्शित झालेले 'बाळा' या गाण्याने तर हिंदी कलाकारांना देखील वेड लावले आहे. स्वप्नील जोशीवर चित्रित करण्यात आलेल्या या सिनेमाच्या 'बाळा' गाण्याची स्टेप्स सध्या भरपूर व्हायरल झाली असून, याचे अनुकरण हिंदीचे प्रसिद्ध स्टारमंडळी करताना दिसत आहेत.

मुंबई : गणेश आचार्य, म्हणजे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले लाडके व्यक्तिमत्व ! अश्या या लाडक्या व्यक्तीमत्वाने दिग्दर्शित केलेल्या 'भिकारी' सिनेमाच्या गाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे, नुकतेच प्रदर्शित झालेले 'बाळा' या गाण्याने तर हिंदी कलाकारांना देखील वेड लावले आहे. स्वप्नील जोशीवर चित्रित करण्यात आलेल्या या सिनेमाच्या 'बाळा' गाण्याची स्टेप्स सध्या भरपूर व्हायरल झाली असून, याचे अनुकरण हिंदीचे प्रसिद्ध स्टारमंडळी करताना दिसत आहेत.

बाॅलिवूड सेलिब्रेटींनी धरला ताल..

डान्समास्तर गणेश आचार्य यांच्या सिनेमातील 'बाळा' गाण्यावर रणवीर सिंग, बॉबी देओल, तुषार कपूर, कुणाल खेमू, वरूण धवन, अर्षद वारसी या हिंदी अभिनेत्यांनी तर परिणीती चोप्रा, जॅकलीन फर्नांडीस आणि तापसी पन्नू या अभिनेत्रींनी ठेका धरला असल्याचा विडीयो व्हायरल झाला आहे. यात श्रेयस तळपदे हा हिंदीत चमकणारा मराठी चेहरा देखील आपल्याला पाहायला मिळत असून, भिकारी सिनेमाच्या प्रदर्शनाची ही मंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत. 

चित्रपटातील मूळ गाणे..

इग्लंड येथे शूट करण्यात आलेल्या या गाण्यात स्वप्नीलने पहिल्यांदाच 'हिप हॉप' केलेले पाहायला मिळत असून, या गाण्यातील त्याची सिग्नेचर स्टेप्स खूप गाजत आहे. स्वप्नीलच्या चाहत्यांमध्ये देखील हे गाणे खूप प्रसिद्ध झाले आहे. स्वप्नीलच्या नृत्याविष्काराचा हा नमुना असून, या गाण्यासाठी त्याने घेतलेली मेहनतदेखील दिसून येते.

या चित्रपटात स्वप्नील जोशीसह ऋचा इनामदार ही नवोदित अभिनेत्री झळकणार असून, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा हे कलाकार देखील आपापल्या प्रमुख भूमिकेत असतील.