भूषण व संस्कृती पुन्हा एकत्र 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

अभिनेता भूषण प्रधान व अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. त्यानंतर आता हे दोघे "ती देते तो देतो ते देतात सगळेच देतात शिव्या' या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. अनोखे नाव असलेला हा चित्रपट शिव्या या संकल्पनेवर आधारित आहे. यात संस्कृती व भूषण यांच्यासह विद्याधर जोशी, उदय सबनीस, पियुष रानडे व शुभांगी लाटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शन साकार राऊत यांनी केले आहे. ते म्हणाले की, "आपण बोलताना सहजपणे शिव्या देतो. त्याचा अर्थ काय, आपल्या आजूबाजूला कोण आहे याचाही विचार करत नाही. शिव्या ही संकल्पना घेऊन एक वेगळ्या धाटणीचे कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे.' 

Web Title: bhushan pradhan and sanskruti balgude