आदित्य ठाकरे यांनी केली होती दिशा पटानी सोबत डिनर डेट.. झाले होते ट्रोल..

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या गाजलेल्या डिनर डेट चा न हा किस्सा..
Bollywood actress disha patani and aditya thackeray dinner date
Bollywood actress disha patani and aditya thackeray dinner datesakal

Happy birthday disha patani : अभिनेत्री दिशा पटानी हे बॉलीवूड मधील महत्वाचं नाव. दिशाचा चाहता वर्ग मोठा आहे मोठा आहे. शिवाय दिशा (disha patani) सोशल मीडियावही बरीच सक्रिय असते. आज १३ जून, योगायोग म्हणजेच आजच्याच दिवशी दिशा पटानी आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांचा वाढदिवस आहे. मध्यंतरी आदित्य आणि दिशा यांच्या विषयी बरीच चर्चा रंगली होती. त्यांच्यात काहीतरी नाते आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवाय त्यांच्या डिनर डेट नंतर त्यांना ट्रोल केले होते. तोच हा किस्सा. (Bollywood actress disha patani and aditya thackeray dinner date) (happy birthday disha patani) (happy birthday aditya thackeray)

Bollywood actress disha patani and aditya thackeray dinner date
राखी सावंत प्रियकरासोबत पोलिस ठाण्यात.. पहिल्या नवऱ्याची केली तक्रार

ही गोष्ट आहे दोन वर्षांपूर्वीची. आदित्य ठाकरे यांनी दिशा पटानी डिनर डेट वर गेले होते. त्यावेळी त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले. दोघांनाही खूप ट्रोल केले गेले. आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांचे अफेअर असल्याच्याही अफवा उठल्या होत्या. मीडियानेही दोघांना याबाबत अनेक प्रश्न विचारले. आजही आदित्य ठाकरे यांच्या पुढे दिशाचे नाव घेतले तर ते हसू लागतात. आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय निघाला की हमखास दिशाचे नाव घेतले जाते. त्यावेळी डिनर डेट वरून दोघांनाही बराच त्रास झाला. आदित्य ठाकरे यांनी मात्र याबाबत मौन बाळगले पण दिशा मात्र गप्प बसली नाही. दिशाने यावर सडेतोड उत्तर दिले होते.

'आपण आपल्या मित्रासोबत लंच किंवा डिनरला जाऊ शकत नाही का? माझ्या मैत्रिणी आहेत त्याप्रमाणे मित्रदेखील आहेत आणि मी त्यांच्यासोबतही बाहेर जाते. मी मुलगा किंवा मुलगी पाहून मैत्री करत नाही. मला जी लोकं आपलीशी वाटतात त्यांच्याशी मी मैत्री करते. मी या क्षेत्रात येण्याआधीच मला माहीत होते की लोकांच्या नजरा सतत मी काय करते यावर असणार आहेत. पण, लोक काय म्हणतील या गोष्टीचा मला फरक पडत नाही.' असे उत्तर दिशाने दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com