वर्षभर नुसती "दंगल'च 

सुशील आंबेरकर
सोमवार, 2 जानेवारी 2017

यंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे बायोपिक किंवा सत्यघटनेवर आधारित होते. आपल्यासारख्याच हाडामासांच्या काही कर्तृत्ववान व्यक्ती त्यांचे हिरो होते. ज्यांनी आपल्याला रिझवलं अन्‌ काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणाही दिली... 

यंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे बायोपिक किंवा सत्यघटनेवर आधारित होते. आपल्यासारख्याच हाडामासांच्या काही कर्तृत्ववान व्यक्ती त्यांचे हिरो होते. ज्यांनी आपल्याला रिझवलं अन्‌ काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणाही दिली... 

सुरुवातच वादाने... 
यंदाच्या वर्षी बॉलीवूडमध्ये कधी नव्हे ती चित्रपट प्रदर्शनावरून प्रचंड वादा वादी झाली. सिनेमांच्या दृश्‍यांवर सेन्सॉरची कात्री, नेतेमंडळींचा हस्तक्षेप, थिएटर्सची तोडफोड, पोस्टरची फाडाफाड, पाक कलाकारांना विरोध, निर्माता-दिग्दर्शकांना धमक्‍या, मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप,असहिष्णूता आणि बलात्कारित महिलेबाबतच्या बेजबाबदार कमेंटस्‌मुळे इंडस्ट्री तापत राहिली... 

सुरुवात झाली ती"उडता पंजाब'ने. ड्रग्जसारख्या विषयावरचं जळजळीत चित्रण सेन्सॉरला खटकलं. तो रिलीज करण्यासाठी अनुराग कश्‍यपला केवढी मिन्नतवारी करावी लागली. एवढं करूनही पिक्‍चर काही चालला नाही. सर्वात गोंधळ घातला तो करण जोहरच्या"ए दिल है मुश्‍कील'ने. काय गरज होती त्याला पाकि स्ता नी कलाकार घ्यायची? वाढता वाद पाहून मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली. आता काय बिशाद आहे कोणाची पाक कलाकारांना घ्यायची. एक"रईस' तेवढा बाकी आहे. त्यातही शाहरूख खानबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान आहे; पण चलाख राजकारणाचे रंग बऱ्यापैकी ओळखलेल्या शाहरूखने तिच्या रोलला बऱ्यापैकी कात्री लावल्याचं समजतंय. ताकही फुंकून पिणं म्हणतात, ते यालाच. 

जमाना बायोपिकचा 
2016वर्ष गाजलं ते बायोपिकमुळे. अनेक कर्तृत्ववान व्यक्ती अन्‌ त्यांच्या जीवनातील संघर्ष नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी मोठ्या खुबीने साकारला. प्रोफेशनल ऍटिट्यूड बाजूला ठेवून त्यांनी उत्तम कलाकृतीला प्राधान्य दिलं. फिल्मी मसाला पार फेकून दिला. खेळाडू असो, तुरुंगातला कैदी असो, कुस्तीपटू असो की हवाईसुंदरी... प्रत्येकाचे कंगोरे परफेक्‍ट उतरल्याने सिनेमे तर रंजक झालेच; वर गल्लापेटीही चांगलीच भरली. सुरुवात अर्थातच"नीरजा'ने केली. सत्यघटनेवर आधारित असलेली पटकथा, विमान अपहरणाचा थरार अन्‌ सोनम कपूरच्या संयत अभिनयामुळे बॉक्‍स ऑफिसवरही चित्रपटाने अनपेक्षित यश मिळवलं."सरबजीत'नेही अनेकांच्या मनाचा ठाव घेतला. 
पंजाबच्या सीमा भागातील सरबजीत सिंग नावाचा युवक चुकून पाकिस्तानाच जाऊन तिथे 22वर्षं तुरुंगात खितपत पडतो. त्याच्या सुटकेचा लढा सिनेमात आहे. रणदीप हुडा अन्‌ ऐश्‍वर्या रायने तो अप्रतिम रंगवला. अर्थात त्याला फारसे प्रेक्षक मिळाले नसले तरी त्याची दखल घेतली गेली. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार एम. एस. धोनीवर आलेल्या सिनेमाने तुफानी खेळी केली. माहीच्या रोलमध्ये सुशांत सिंग राजपूतने धडाकेबाज काम केलं. दिग्दर्शक नीरज पांडेची कलात्मकता आणि माहीच्या क्रेझमुळे चित्रपटाने तब्बल 134 कोटीचा व्यवसाय करत"दंगल' अन्‌"सुलतान'नंतर तिसरा क्रमांक पटकावला. त्या तुलनेत महमद अझरुद्दीनवर आलेला"अझर' हिट विकेट ठरला. सत्य घटनेत थोडा"काल्पनिक मसाला' पेरल्याने त्याची रेसिपी बिघडली. 

सत्य घटनाही गाजल्या 
बायोपिक सिनेमांनंतर खऱ्या अर्थाने 2016वर्ष गाजवलं ते सत्य घटनेवर आधारित कथांनी. अर्थात दोन्ही सिनेमे अक्षय कुमारच्या नावावरच आहेत."एअरलिफ्ट' अन"रुस्तमने' त्याच्या फॅन्सबरोबरच इतरांनाही खिळवून ठेवले. दोन्ही चित्रपटांनी साधारण 125 कोटींचा बिझनेस केला. एक गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायला हवी, की सध्याचे निर्माते फक्त सपनों के सौदागर न बनता कल्पकतेकडे वळले आहेत. विषय कोणताही असो, प्रेक्षकांना खि ळवून ठेवणारे सि नेमेही यशाबरोबरच पैसाही पोतडीत टाकत असल्याचे त्यांना उमजल्याने तद्दन मसालापट कमी होत चालले आहेत. अर्थात काही गडी असे आहेत की, ज्यांना पाणचटपणाच हवा असतो. अशा सिनेमांनीही वर्षभर धमाल केली. बॉलीवूडला क्‍लासच्या बरोबरीनेच पिटातल्या प्रेक्षकांचीही काळजी घ्याली लागते ना... कमरेखालचे विनोद, प्रेक्षकांना नेत्रसुख देणारे सीन,ऍक्‍शन, रोमान्स, हॉरर, सस्पेन्स, ब्रेकअप्‌ , विवाहबाह्य संबंध अन्‌ प्रचंड मारधाड असलेले सिनेमेही बेतास बेत यश मिळवून गेले. सुरुवात अर्थातच हाऊसफुल थ्रीने केली. मागोमाग मस्तीजादें, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, ढिश्‍युम, सनम रे, लव्ह गेम्स, वजह तुम हो, क्‍या कूल है हम:3, हेट

स्टोरी: 3, रॉकी हॅण्डसम, अ फ्लाईंग जाट, बेफिक्रे, बार बार देखो, फितूर, राज रिबूट, घायल वन्स अगेन इ. इ. आले नि पोटापुरती कमाई करून गेले. 

बिग बींची जादू 
ध्येही पंचाहत्तरीतला महानायक अमिताभ बच्चन यांची जादू पाहायला मिळाली. वजीर, तीन आणि पिंक असे त्यांचे तीन सिनेमे रिलीज झाले. तीनही अगदी वेगळ्या वाटेवरचे. मात्र, पिंक त्यातल्या त्यात प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरला. एका रिटायर्ड वकिलाने पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठीचा लढा त्यात दिसला. 

चाकोरीबाहेरच्या सिनेमांचं वर्ष 
व्यावसायिक चौकट पार करून अनेक निर्माते- दिग्दर्श कांनी एकापेक्षा एक सरस सिनेमे 2016 मध्ये दिले. तळागाळातील महिलांच्या मूक वेदना मांडणारा पार्च्ड, माय लेकींची कथा असणारा नील बट्टे सन्नाटा, सायकॉलॉजिकल थ्रिलर असलेला फोबिया आणि एका प्राध्यापकाचं द्वंद्व असलेला अलिगढ, नातेसंबंध आणि आजच्या मॉडर्न जगातील प्रेम वेगळ्या पद्धतीने उलगडून दाखवणारे की ऍण्ड का, कपूर ऍण्ड सन्स, डिअर जिंदगी, बेफिक्रे अन्‌ ए दिल है मुश्‍कीलच्या बरोबरीने झळकलेल्या मदारी, फ्रेकी अली, लव्ह शुदा, चॉक ऍन डस्टर, वेटिंग आदी सिनेमांनीही वर्ष गाजवलं. 

अनपेक्षित अपयश 
2016ध्ये अनेक इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांना अपयशाची चव चाखावी लागली. त्यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते उडता पंजाब, मोहोंदोजारो, मिर्झिया अन रॉक ऑन2 या सिनेमांचं. उच्च निर्मितीमूल्य असूनही आशुतोष गोवारीकरांचा सिनेमा हृतिक रोशनसारखा कलाकार असूनही म्हणावं तसा चालला नाही. एक प्राचीनकालीन सिनेमा; पण लव्हस्टोरीत गुरफटला, असं म्हणावं लागेल. राकेश ओमप्रकाश मेहरांच्या मिर्झियाचीही मोठी हवा होती; पण ती चाललीच नाही. अख्तरच्या रॉक ऑनचाही बॅण्ड वाजला. 

'खान'दानी यश 
यंदाच्या वर्षी अर्थात पुन्हा एकदा शर्यतीत धावले ते उतारवयातील तीन खान. आमीर, सलमान अन शाहरूखच्या सिनेमांनी बॉक्‍स ऑफिसच्या तिजोरीत करोडो रुपये कमावून दिले. गेला बाजार अक्षय कुमार काय तो त्यांना भिडला; तरीही बाजी मारली ती 
खानांनीच. आधी शाहरूखने फॅन 85 कोटींची छोटी बोली लावली. सलमानने सुलतान तीनशे कोटींचा पलटवार केला. मग डिअर जिंदगीतून पुन्हा शर्यतीत आलेल्या शाहरूखला फक्त 60 कोटींवर घ्यावी लागली. दोघांवर असली धोबीपछाड केला तो आमीरने. त्याचा दंगल कुस्तीच्या फडात अव्वल ठरलाय . अवघ्या सात दिवसांत त्याचे जगभरातील कलेक्‍शन आहे तब्बल 300 कोटी. थिएटरमधून तो इतक्‍यात उतरण्याची शक्‍यता नाही. अप्रतिम कलाकृती पाहण्यासाठी सच्चा चित्रपटवेडा काहीही करू शकतो. अगदी नोटाबंदी असली तरी हेच यातून दिसतं. गंमत म्हणजे काही महिन्यांपूर्वी आमीरने देशातील असहिष्णुतेबद्दल विधान केलं होतं. पत्नी किरण रावला भारत आता सुरक्षित वाटत नाही. भारत सोडण्याचा विचारही मनाला शिवून गेला होता, असं तो म्हणाला होता. त्यावरून तेव्हा वादळ उठलं होतं; पण भारतीय चित्रपट रसिकांच्या मनाचा मोठेपणा पाहा... त्याच आमीरचा दंगल आता वादळासारखा त्यांच्या मनात घोंघावतोय... हीच तर गंमत आहे बॉलीवूड माया नगरीची... 

टॉप टेन हिट चित्रपट 
सुलतान : 300 
दंगल : (आठवड्याचं उत्पन्न) 
एम एस धोनी : 134 
एअरलिफ्ट : 129 
रुस्तम :128 
ए दिल है मुश्‍कील :113 
हाऊसफुल 3 :110 
शिवाय :101 
फॅन : 85 

(उत्पन्नाचे आकडे कोटीत)