बोमन इराणींचे "कैलाश सत्यार्थी' 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जून 2017

"व्हेंटिलेटर' आणि "एफ. यू.' या दोन मराठी चित्रपटांत काम केल्यानंतर बोमन इराणी आता बाल अधिकार चळवळीतील नोबेलविजेते कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते ब्रह्मानंद सिंह दिग्दर्शित "झलकी' या चित्रपटात बोमन कैलाश सत्यार्थी यांची व्यक्तिरेखा रंगवणार आहेत. एक छोटी मुलगी बालमजुरी करता करता आपल्या भावाचा शोध घेते, अशी या चित्रपटाची कथा आहे.

बोमन म्हणाले, "सत्यार्थी अशी व्यक्ती आहे, ज्यांच्याबद्दल सर्वांनाच अभिमान वाटतो. या चित्रपटाचे चित्रीकरण करताना चांगला अनुभव आला. मला तेथील लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.'