बुगरा गुलशोयचं ऍनिमेशन डबिंग 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

ऍनिमेटेड चित्रपट हे सर्व वयोगटांतील लोकांना आवडतात आणि अशा चित्रपटांचं स्वत:चं असं एक आकर्षण असतं; पण एक ऍनिमेटेड चित्रपट बनवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. प्रत्येक पात्र जिवंत करताना त्या पात्रासाठी योग्य तो आवाज शोधणं हे फार महत्त्वाचं असतं. आईस एज या चित्रपटाच्या सीरिजमधील चौथ्या चित्रपटाच्या सीरिजला जगभर लोकप्रियता मिळाली आणि या चित्रपटाचं जगभरातील अनेक भाषांमध्ये डबिंग करण्यात आलं. तुर्कस्तानात "आईस एज-4'मध्ये सिड या पात्राचा भाऊ मार्शलचा आवाज हा दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचा नसून कुजे गुने या टर्किश मालिकेत गुनेची भूमिका करणाऱ्या बुगरा गुलशोयचा आहे.

ऍनिमेटेड चित्रपट हे सर्व वयोगटांतील लोकांना आवडतात आणि अशा चित्रपटांचं स्वत:चं असं एक आकर्षण असतं; पण एक ऍनिमेटेड चित्रपट बनवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. प्रत्येक पात्र जिवंत करताना त्या पात्रासाठी योग्य तो आवाज शोधणं हे फार महत्त्वाचं असतं. आईस एज या चित्रपटाच्या सीरिजमधील चौथ्या चित्रपटाच्या सीरिजला जगभर लोकप्रियता मिळाली आणि या चित्रपटाचं जगभरातील अनेक भाषांमध्ये डबिंग करण्यात आलं. तुर्कस्तानात "आईस एज-4'मध्ये सिड या पात्राचा भाऊ मार्शलचा आवाज हा दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचा नसून कुजे गुने या टर्किश मालिकेत गुनेची भूमिका करणाऱ्या बुगरा गुलशोयचा आहे. ही मालिका सध्या जिंदगी चॅनेलवर दाखवली जातेय. बुगरा मल्टीटॅलेंटेड आहे. तो आर्किटेक्‍ट, फोटोग्राफर, ग्राफिक डिझायनर व शॉर्ट फिल्म दिग्दर्शक अशा सगळ्या भूमिका तो निभावतो. या चित्रपटाच्या डबिंगबद्दल बुगरा म्हणतो, "ही एक छोटीशी सुरुवात आहे. माझी कधीपासूनची एक ऍनिमेटेड पात्र डब करायची इच्छा होती. अशा क्रेझी ऍनिमेटेड पात्रासाठी डब करण्याचा अनुभव खूप मजेशीर होता.' 

Web Title: bugra gulsoy animation dubbing

टॅग्स