रिव्ह्यू बसस्टाॅप: #Live सोंगं कमी पात्रं फार!

सौमित्र पोटे/ कॅमेरा : किरण कारंडे.
गुरुवार, 20 जुलै 2017

समीर जोशी दिग्दर्शित बसस्टॉप हा सिनेमा येतोय. सिनेमात खूप व्यक्तिरेखा आहेत. उत्तम कलाकार आहेत. पण इतके कलाका सिनेमात असल्यानंतर यांचं नेमकं काय करायचं तेच न उमगल्याने सावळा गोंधळ झाला आहे. या सिनेमाला ई सकाळने दिले आहेत 2 चिअर्स.

पुणे: समीर जोशी दिग्दर्शित बसस्टॉप हा सिनेमा येतोय. सिनेमात खूप व्यक्तिरेखा आहेत. उत्तम कलाकार आहेत. पण इतके कलाका सिनेमात असल्यानंतर यांचं नेमकं काय करायचं तेच न उमगल्याने सावळा गोंधळ झाला आहे. या सिनेमाला ई सकाळने दिले आहेत 2 चिअर्स.

<

>

समीर जोशी यांनी यापूर्वी मंगलाष्टक वन्स मोअर, मामाच्या गावाला जाऊया असे सिनेमे केले आहेत. आता बसस्टॉप या सिनेमातून त्यांनी पालक आणि मुलांच्या नात्याला स्पर्श करत असल्याचा दावा केला आहे. सिनेमात खूप मोठी कास्ट आहे. पण नेमका भार कशावर द्यायचा ते दिग्दर्शकाला कळलेलं नाही.

 जुने विनोद, उथळ संवाद, पात्रांना नसलेला तर्क यामुळे हा सगळा खटाटोप वाया गेला आहे. कलाकारांच्या तोंडी असलेले अत्यंत पानचट विनोद.. ढोबळ कथानक यामुळे हा सगळा प्रकार वरवरचा झाला आहे. 

एकूण कला दिग्दर्शन, वेशभूषा, संगीत यावर सिनेमा तगला आहे. म्हणून इ सकाळने या सिनेमाला दिले 2 चिअर्स. 

दिग्दर्शक समीर जोशी, कलाकार अनिकेत विश्वासराव, सिध्दार्थ चांदेकर, सुयोग गोऱ्हे यांच्या समक्ष हा रिव्ह्यू झाला. यात दिग्दर्शकानेही त्याची बाजू मांडली. 

चांगले कलाकार असूनही या कलाकारांचे नेमके काय करायचे तेच न ठरवता आल्याने सगळा घोळ झाला आहे.