कान्समध्ये पुन्हा पारोची जादू 

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

'सिलसिला ये चाहत का न मैंने बुझने दिया' या गाण्यावर नाचत आपल्या देवबाबूची वाट पाहणारी पारो आठवत्येय का तुम्हाला? अभिनेत्री ऐश्‍वर्या रायने "देवदास'मधील पारोच्या भूमिकेत चांगलेच रंग भरले होते. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्‍वर्या पुन्हा पारो जिवंत करणार आहे.

ऐश्‍वर्याने नुकतीच करण जोहरच्या "ऐ दिल है मुश्‍किल' चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती. आपण आजही तितक्‍याच ताकदीने भूमिका साकारू शकते हे तिने "सरबजीत' आणि "जज्बा' चित्रपटांतून दाखवून दिले आहे. आई झाल्यानंतर तिने रूपेरी पडद्यापासून काही काळ सुट्टी घेतली होती. त्यानंतर तिने मोजकेच; पण चांगले चित्रपट केले. आता ती जगप्रसिद्ध कान्स फेस्टिवलसाठी सज्ज होतेय.

कान्सचा 70 वा वर्धापनदिन आहे. त्या फेस्टिवलमध्ये तब्बल 15 वर्षांनंतर ऐश्‍वर्याचा "देवदास' चित्रपट दाखवला जाणार आहे. 20 मे रोजी लॉरियल पॅरिस ओपन एअर सिनेमा बॅनर तो प्रेझेंट करणार आहे. ऐश्‍वर्या म्हणते, "आम्ही फक्त एक आर्टिस्ट म्हणून नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीचे सन्माननीय प्रतिनिधी म्हणून कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावतो. भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा आनंद अभिमानास्पद असतो.'2002 मध्ये "देवदास' चित्रपटाच्या प्रदर्शना वेळी ऐश्‍वर्या शाहरूख खानसोबत कान्स फेस्टिवलमध्ये रथात बसून आली होती.