सेन्साॅरवाल्यांनो तुमचा प्राॅब्लेम काय आहे? अनंत महादेवन यांचा सवाल

रविवार, 24 सप्टेंबर 2017

दिग्दर्शक अनंत महादेवन दिग्दर्शित अक्सर 2 आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या हा चित्रपट सेन्साॅरकडे आहे. या चित्रपटाती आज जिद हे गाणं भारतीय प्रेक्षकांसाठी अनुचित असल्याचे प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज करणाऱ्या सेंट्रल बोर्ड फाॅर फिल्म सर्टिफिकेशन यांनी सुचवलं आहे. यावर महादेवन यांनी या गाण्यात आक्षेप घेण्यासारखं काहीच नसल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आहे. शिवाय सेन्साॅरला नक्की अडचण काय आहे तेच मला कळत नाही असंही म्हटलं आहे. 

अक्सर 2 चित्रपटातील अाज जिद या गाण्याला सीबीएफसी बोर्डाकडून कात्री 
 

मुंबई : दिग्दर्शक अनंत महादेवन दिग्दर्शित अक्सर 2 आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या हा चित्रपट सेन्साॅरकडे आहे. या चित्रपटाती आज जिद हे गाणं भारतीय प्रेक्षकांसाठी अनुचित असल्याचे प्रसून जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज करणाऱ्या सेंट्रल बोर्ड फाॅर फिल्म सर्टिफिकेशन यांनी सुचवलं आहे. यावर महादेवन यांनी या गाण्यात आक्षेप घेण्यासारखं काहीच नसल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आहे. शिवाय सेन्साॅरला नक्की अडचण काय आहे तेच मला कळत नाही असंही म्हटलं आहे. 

सेन्साॅरच्या या निर्णयामुळे नाराज झालेले महादेवन म्हणाले, आज जिद हे गाणं खरंतर खूपच श्रवणीय झालं आहे. शिवाय सेन्साॅरला यात काय अनुचित वाटलं तेच मला कळत नाहीय. आम्ही जेव्हा या ट्रॅकवर काम करत होतो, त्यावेळी या गाण्यात महंमद रफी यांनी गायलेल्या आणि संजीवकुमार यांच्यावर चित्रित झालेल्या दस्तकमधील तुमसे कहू एक बार.. या गाण्याचे संदर्भ आम्ही घेतले होते. मदन मोहन यांनी तो ट्रॅक बनवला होता. तो ट्रॅक आम्ही घेतला. शबिना खान यांनी फार सुंदर असं त्याचं चित्रिकरण केलं आहे. मला वाटतं, अक्सर 2 मध्ये आज जिद हे गाणं खरंतर एक उदाहरण आहे. सेन्सुएस गाणं नक्की कसं शूट करावं त्याचं हे उदाहरण आहे. शिवाय आमच्या कलाकारांनी या गाण्यावर कोणतेही अश्लील हावभाव केलेले नाहीत.