चाहूल2 मध्ये आणखी एक नवे वळण

टीम इ सकाळ
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

चाहूल २ मालिका नुकतीच रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. निर्मला सर्जाला आपल्या युष्यात आणण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाली असून, खरी शांभवी कुठे आहे, कशी आहे हे  कोणालाच कळलेले नाही. निर्मलाने सर्जाशी  ग्न केले, तसेच शांभवीला मारून टाकण्याचा प्रयत्न देखील केला पण, त्यामध्ये तिला यश आले नाही. शांभवीच्या रुपात तिने सर्जाच्या आयुष्यात बायको म्हणून स्थान मिळवले, पण निर्मलाच्या समोर जेंव्हा खरी शांभवी उभी राहिली तेंव्हा मात्र र्मलाच्या पायाखाली जमीन सरकली.

मुंबई ११ सप्टेंबर, २०१७ : चाहूल २ मालिका नुकतीच रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. निर्मला सर्जाला आपल्या युष्यात आणण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाली असून, खरी शांभवी कुठे आहे, कशी आहे हे  कोणालाच कळलेले नाही. निर्मलाने सर्जाशी  ग्न केले, तसेच शांभवीला मारून टाकण्याचा प्रयत्न देखील केला पण, त्यामध्ये तिला यश आले नाही. शांभवीच्या रुपात तिने सर्जाच्या आयुष्यात बायको म्हणून स्थान मिळवले, पण निर्मलाच्या समोर जेंव्हा खरी शांभवी उभी राहिली तेंव्हा मात्र र्मलाच्या पायाखाली जमीन सरकली. तिला कल्पना आली कि आता शांभवी सर्जाला आपल्यापासून दूर करणार. खरी शांभवी  ता राणी नावाने वाड्यामध्ये आली आहे. राणी सर्जाला वेळोवेळी तीच खरी शांभवी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न देखील  रते आहे. सर्जा हे  राणीवर विश्वास ठेवेल ? खरी शांभवी सर्जासमोर निर्मलाचे सत्य कसे आणेल ? सर्जाला कशी ती निर्मला पासून वाचवेल ? अश्या अनेक निरुत्तरीत प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत चाहूल २ मध्ये तेंव्हा बघायला विसरू  का चाहूल २ कलर्स मराठीवर सोम ते शनि रात्री १०.३० वा.
 
 सर्जाला खऱ्या शांभवीचा पत्ता अजूनही लागलेला नसून, आता खरी शांभवी निर्मलाच्या समोर आलेली आहे मामाने सांगितल्याप्रमाणे तिने स्मृती गेल्याचे सगळ्यांना खोटे सांगितले आहे. सर्जा शांभवीला ओळखू शकला नाही कारण तिचा आता चेहरा बदलला आहे, पण, निर्मलाने मात्र शांभवीला ओळखले आहे. खऱ्या शांभवीने म्हणजेच राणीने हातामध्ये रुद्राक्ष घातल्यामुळे निर्मला तिला काहीच करु शकत नाहीये. निर्मला म्हणजेच खोट्या शांभवीला सर्जाला मारायचे आहे, कारण असे करूनच तिला सर्जा मिळू शकतो. निर्मलाचे हे सत्य शांभवीला कळले असून ती कशी निर्मलाला थांबवेल हे बघणे रंजक असणार आहे.
 
वाड्यामध्ये सुरु असलेल्या घटनांमागे काय चालू आहे ? कोण करत आहे ? वाड्यामध्ये सुरु असलेल्या या घटनांचा आणि सर्जाचा काही संबंध आहे का ? यांसारखे खूप प्रश्न खऱ्या शांभवीला म्हणजेच राणीला पडले आहेत. शांभवीचा हे सत्य शोधण्याचा आणि सर्जाला निर्मलाच्या जाळ्यातून मुक्त प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे खऱ्या शांभवीचा हा प्रवास नक्की बघा चाहूल २ मध्ये सोम ते शनि रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :