'शेफ'ने वाढवली उत्सुकता

टीम ई सकाळ
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

सैफ अली खानचा शेफ आता प्रदर्शनाला सज्ज झाला आहे. चित्रपटाची उत्सुकता वाढवण्यासाठी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाॅंच करण्यात आला. 2014 मध्ये आलेल्या अमेरिकन चित्रपट शेफ याचा हा सिनेमा अधिकृत रिमेक आहे. 

मुंबई : सैफ अली खानचा शेफ आता प्रदर्शनाला सज्ज झाला आहे. चित्रपटाची उत्सुकता वाढवण्यासाठी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाॅंच करण्यात आला. 2014 मध्ये आलेल्या अमेरिकन चित्रपट शेफ याचा हा सिनेमा अधिकृत रिमेक आहे. 

परदेशात शेफ असणाऱा नायक सुट्टीसाठी मायदेशी येतो. त्यानंतर आपलं कुटुंबं आणि नोकरी यांतल्या द्वंद्वाला नवी सुरूवात होते. टीनएजर मुलगा बापाला आपल्याच देशात थांबण्याची विनंती करतो, हट्ट करतो. त्यानंतर मुलाच्या हट्टापायी तो आपल्या देशात येतो आणि इथे आपलं हाॅटेल उघडतो. हे हाॅटेलही आगळं आहे. ट्रेलरमध्ये त्याचा अंदाज येतो. मग हा बाप आपलं हाॅटेल कसं चालवतो आणि दरम्यान त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं बाॅंडिंग कसं वाढतं त्याचा हा सिनेमा आहे. बऱ्याच दिवसांनी सैफ अली एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.