हैद्राबाादमध्ये बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन

children film festival hydrabad esakal news
children film festival hydrabad esakal news

मुंबई : बॉलिवुड, हॉलिवुड आणि सिनेमा जगाच्या वैविध्यपूर्ण विभागांतील कलाकार हैदराबाद येथे आठवडाभर चालणार्‍या विसाव्या आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवात (आयसीएफएफआय) सहभागी होण्यासाठी गोळा झाले आहेत. चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी, इंडिया (सीएफएसआय)कडून आयोजित होणारा हा महोत्सव ८ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

हा गोल्डन एलिफंट महोत्सव जगातील सर्वांत मोठा महोत्सव असून त्याचे आयोजन तेलंगणा सरकार, सीएफएसआय आणि माहिती आणि प्रसार मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. सीएफएसआयला आतापर्यंत विविध वर्गवारींमध्ये १०९ देशांमधून १४०२ प्रवेशिकांची विक्रमी संख्या मिळाली असून त्यात एनिमेशन, डॉक्युमेंटरी आणि लघुपट असल्याचे सीएफएसआयच्या रिलीजने स्पष्ट केले आहे.

सीएफएसआयमध्ये आमचा विश्वास आहे की प्रत्येक मुलाकडे सांगण्यासाठी एक गोष्ट आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवून काही वर्षांपूर्वी सीएफएसआयने लिटिल डायरेक्टर्स हा विभाग सुरू केला. यात मुलांसाठीचे चित्रपट मुलांनी स्वतः बनवलेले असतात. मुलांनी स्पर्धात्मक आणि बिगर स्पर्धात्मक वर्गवारींमध्ये बनवलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन लिटिल डायरेक्टर्सच्या वर्गात केले जाते. आगामी २० व्या आयसीएफएफआयमध्ये आमहाला लिटिल डायरेक्टर्सच्या विभागात ३० पेक्षा अधिक देशांमधून १७९ प्रवेशिका आल्या आहेत. यातील १०१ भारतातील आहेत आणि उर्वरित (७८) इतर देशांमधील आहेत. त्यामुळे यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहभाग आहे आणि इतक्या देशांमधील मुलांनी बनवलेल्या कलात्मक चित्रकथा प्रदर्शित करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे मत सीएफएसआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रावण कुमार यांनी व्यक्त केले.

या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना 'न्यू इंडिया' ही आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०२२ पर्यंत नवीन भारताच्या निर्मितीच्या वचनाशी साधर्म्य राखणारी आहे. आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात श्री. मोदी यांनी भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांचा सामना करून नवीन भारताच्या निर्मितीचा पण स्पष्ट केला होता.

चित्रपटनिर्मिती आणि कथाकथनाच्या विविध घटकांबाबत कार्यशाळा आणि मुक्तपीठांची मालिकाच २० व्या आयसीएफएफआयच्या निमित्ताने आयोजित केली जाईल. त्यात या क्षेत्रातील मुले आणि तज्ञ सहभागी होतील. यासोबतच प्रश्नोत्तरांच्या सत्राचेही आयोजन केले जाईल ज्यामुळे मुलांना चित्रपटनिर्मिती आणि संबंधित विषयांच्या विविध घटकांची माहिती घेणे शक्य होईल.

विसावा गोल्डन एलिफंट आयसीएफएफआय हा एक द्वैवार्षिक महोत्सव आहे जो भारतातील तरूण प्रेक्षकांसाठी अत्यंत सुंदर, कलात्मक आणि कल्पनात्मक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बालचित्रपट आणतो. नोव्हेंबर २०१७ च्या पहिल्या सहामाहीत उत्तम फिचर, लघुपट, लाइव्ह एक्शन, एनिमेशन आणि लिटिल डायरेक्टर्सचे चित्रपट सात दिवसांच्या उत्सवादरम्यान सादर केले जातील.

आयसीएफएफआय या जगातील सर्वांत मोठ्या आणि सर्वांत दिमाखदार बालचित्रपट महोत्सवांमध्ये गणल्या जाणार्‍या महोत्सवात उत्तम दर्जाचे आंतरराष्ट्रीय बालचित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यात या मुलांना अन्य़था कधीही सहभागी होण्याची संधी मिळणार नाही. या महोत्सवामुळे मुलांना जगातील विविध भागांमधील इतर मुले, पाहुणे, परीक्षक सदस्य आणि चित्रपट दिग्दर्शकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळेल.

या महोत्सवाचे ध्येय हे विविध प्रकारच्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचे आहे ज्यातून इतर संस्कृती, आयुष्ये आणि अनुभव यांच्याबाबत मुलांमध्ये सुस्पष्टता येईल आणि मुलांना जगभरातील घटनांबाबत मत व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे डॉ. कुमार पुढे म्हणाले.

सीएफएसआय कायमच मुलांनी स्वतः बनवलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून गोष्टी सांगण्यावर भर देईल, जेणेकरून तरूण मनांमधील कलात्मक बाजू मजबूत आणि महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार्‍या होतील. सीएफएसआयमध्ये आम्ही २६० पेक्षा अधिक चित्रपटांच्या उत्तम ग्रंथालयाची निर्मितीच नाही तर वापरही केला आहे, देशभरात पसरलेल्या मोठ्या आऊटरिच प्रोग्रामच्या माध्यमातून लाखो मुलांसाठी प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण सिनेमा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक विविधांगी वाढ असून ती सीएफएसआयच्या मागील सहा दशकांच्या कालावधीत कधीही दिसली नव्हती, असे मत डॉ. कुमार यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com