कॉमेडी नाइट्‌सला 'बचाओ'?

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

छोट्या पडद्याचा बादशहा म्हणून लोकप्रिय असलेल्या कपिल शर्माने "कॉमेडी नाइट्‌स' हा शो सोडल्यानंतर कलर्स वाहिनीचा टीआरपी जरा खाली आला. त्यानंतर ओढून ताणून सुरू असलेला "कॉमेडी नाइट्‌स बचाओ' या कार्यक्रमालाच आता "बचाओ' म्हणण्याची वेळ आली आहे. सोनी वाहिनीवरील "द कपिल शर्मा शोला टक्कर देणारा"कॉमेडी नाइट्‌स बचाओ'हा कार्यक्रम आता बंद होणार आहे.

कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग यांचा"कॉमेडी नाइट्‌स बचाओ ताजा' हा कार्यक्रम लवकरच बंद होणार आहे. या कार्यक्रम येणाऱ्या पाहुण्यांचा त्यांना न खिल्ली उडवली जात. कार्यक्रम बंद होण्याचे हेच प्रमुख कारण असावे असे काहींनी मत स्पष्ट केले. यामुळे बहुतेक कलाकारांनी आता यांत सहभागी होण्यास नकार दिला आहे.

या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कृष्णा अभिषेक म्हणाला,""पहिल्या पर्वापेक्षा दुसऱ्या पर्वाचे स्वरुप वेगळे होते. या कार्यक्रमाचे 400 एपिसोडपर्यंतचे चित्रिकरण झाले आहे. साधारणपणे फेब्रुवारीपर्यंत बंद होऊन मे महिन्यात याची कदाचित नवी झलक पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे.''

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी हे कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेले होते. त्यांच्यावर करण्यात आलेले विनोद त्यांना आवडले नसल्यामुळे त्यांनी शोमधून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. जॉनच्या अभिनय कौशल्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्यामुळे त्याला राग आला होता. पार्च्ड सिनेमाच्यावेळेला अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीने देखील वर्णभेदावरून केलेल्या विनोदांमुळे अर्धवट सोडून गेली. यासंदर्भात तनिष्ठाने फेसबुकवर एक पोस्टही लिहली होती. सह कलाकारांनीदेखील सोशल मीडियावरुन कलर्स वाहिनीवरील या कार्यक्रमाविषयी तक्रार केली होती. त्यानंतर कलर्स वाहिनीने यासंदर्भात माफीही मागितली होती.

एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, हा वादग्रस्त कार्यक्रम लवकरच बंद होणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. अक्षय आणि ऋतिक रोशन यांच्याआधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवन, शरद मल्होत्रा, सुमीत व्यास, मनन देसाई आणि अमृता खानविलकर यांनी देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. हा कार्यक्रम टीआरपीमध्येही हळूहळू खाली येत आहे.