प्रशांत दामले आणि अतुल कुलकर्णी यांच्यात फेसबुकवर 'कमेंट वॉर'

शुक्रवार, 25 मे 2018

हाँगकाँग, चायना आणि सिंगापुर येथील पेट्रोलचे भाव भारतापेक्षा तरी जास्तच आहे. अशा आशयाची ही पोस्ट आहे. ज्यावर दामले यांच्या चाहत्यांसोबतच अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी देखील एक लांबलचक कमेंट केली आहे. 

इंधन दरवाढीविरोधात आता सेलिब्रिटीही सोशल मिडीया द्वारे व्यक्त होत आहेत. नुकताच अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरुन पेट्रोलचे दर सांगणारी एक पोस्ट केली आहे. पण हे दर भारतातील पेट्रोलचे नसून परदेशातील आहे. हाँगकाँग, चायना आणि सिंगापुर येथील पेट्रोलचे भाव भारतापेक्षा तरी जास्तच आहे. अशा आशयाची ही पोस्ट आहे. ज्यावर दामले यांच्या चाहत्यांसोबतच अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी देखील एक लांबलचक कमेंट केली आहे. 

कुठल्या विचारसरणीला काहीही करुन कुणी कशाप्रकारे पाठींबा द्यावा हा ज्याच्या त्याच्या भूमिकेचा आणि राजकारणाचा भाग असल्याचे अतुल यांनी या कमेंट मध्ये म्हटले आहे. अगदी स्पष्ट आणि नम्रपणे अतुल यांनी इंधन दरवाढ या विषयावर आपल्या विचारसरणीनुसार व्यक्त होण्यापेक्षा त्या विषयातील तज्ञांची मतं वाचणे आणि ती समजून घेणे योग्य ठरतात, असे सांगितले आहे. तसेच दामले यांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करीत 'काही चुकिचं बोललो असेन तर आधी कान उपटून मग माफ करशीलच!!' असे मिश्किलपणे अतुल व्यक्त झाले आहेत. या संपूर्ण कमेंटचा रोख इंधनदरवाढीविरोधात होता, असे कमेंट वाचल्यावर कळून येते. 

प्रशांत दामले यांच्या या पोस्टला चाहत्यांचा भरपुर प्रतिसाद मिळत आहे. पण इंधन दरवाढीचे समर्थन करणारे अगदीच मोजके आहेत. बऱ्याच जणांनी इतर देशांच्या पेट्रोलचे भाव सांगण्याआधी त्यांचे दरडोई उत्पन्नही बघा, असा सल्लाही दिला आहे. 

 

Web Title: Comment War Between Prashat Damle And Atul Kulkarni