समाजातील ज्वलंत विषयावर प्रकाश टाकणारी "वेबसीरिज' 

Community reverse light shining ones 'webseries'
Community reverse light shining ones 'webseries'

सध्याचं युग तंत्रज्ञानाचं आहे. या युगात वावरताना सामान्य जनता सर्वाधिक इंटरनेटचा वापर करताना दिसतेय, याचाच वेध घेत आम्ही या क्षेत्रात उडी घेतली व त्यातच काहीतरी वेगळं निर्माण करायचं, असा संकल्प केला आणि मग डोक्‍यात आले "द डायरी ऑफ सायको' ही आगळी वेगळी वेबसीरिज. ही वेबसीरिज सुरू करताना आम्ही लक्षात घेतले, की वेबसीरिजना दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चाललाय, दर आठवड्याला नवीन वेबसीरिज येतेय पण वेबसीरिज म्हणजे टाइमपास, हलकं-फुलकं, कॉमेडी, व्हल्गर भाषा किंवा मग बोल्ड असा काहीतरी समज बऱ्याच जणांना झालाय. पण "द डायरी ऑफ सायको' या सर्व समजांना छेद देणारी वेबसीरिज आम्ही सुरू केली. ही भारतातील पहिली "फाऊंड फुटेज' वेबसीरिज आहे. 
- नितीन वाघ 

मू. जे. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागात शिकत असताना सुरवातीपासूनच नाट्यक्षेत्रात काहीतरी नवीन निर्माण करण्याची आस होती. त्याप्रमाणे बी.ए. नाट्यशास्त्र पदवी पूर्ण केल्यानंतर मुंबई गाठलं. मुंबईत काही काळ या क्षेत्रात प्रयत्न केल्यानंतर माझी निवड नाट्यक्षेत्रातील नामवंत अशा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली. नाट्यशास्त्रातील सर्वांगीण विकास नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये झाला. शिक्षण घेतल्यानंतर मी "द वंडरफूल बेड' हा लघुपट तयार केला आणि या लघुपटाला "स्पेक्‍ट्रम फिल्म फेस्टिव्हल'मध्ये रौप्यपदक मिळालं. माझ्या यशस्वी करिअरला या लघुपटापासून सुरवात झाली. नंतर मी "कलर्स मराठी' या वाहिनीवरच्या "तू माझा सांगाती' या मालिकेसाठी संवादलेखन केले. रझाकार, क्‍लासमेट्‌स यासारख्या काही सिनेमे आणि मालिकेसाठी मी डबिंगही केलं. त्यासोबतच मी आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपटामध्ये किशोरवयीन संभाजी महाराजांची भूमिका तर लवकरच हिंदी सिनेमातही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 


हे सारं करताना माझ्या मनात सतत काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची आस लागून होती. मी खूप विचार केला आणि तरुणाची सध्याला सर्वांत जास्त मागणी असलेल्या वेबसिरीजचा माझ्या मनात शोध लागला आणि त्यातच पेट घेतला "द डायरी ऑफ सायको' या माझ्या नवीन स्वलिखित व दिग्दर्शित वेबसीरिजने. मराठीमध्येही या जेनरवर एकही सिनेमा किंवा मालिका नाही ही पहिलीच क्राइम थ्रिलर म्युझिकल वेबसीरिज. या वेबटिझरला "वीझर' हे नाव जगात पहिल्यांदा वापरले गेले आणि चित्रपट क्षेत्रातल्या काही कलाकारांकडून या "एक्‍सपरिमेंट- धाडसाबद्दल' भरभरून कौतुक होते आहे. या वेबसीरिजच्या ट्रेलरला आणि विझरला यू-ट्यूब वर भरभरून प्रतिसाद आले आणि 26 जानेवारीला या वेबसीरिजचा पहिला एपिसोड आम्ही रिलीज करणार आहोत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com