दोघात तिसरी... 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

बॉलीवूडचा दबंग खान सलमान लवकरच नृत्य-दिग्दर्शक रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित चित्रपटात झळकणारेय. सलमान पहिल्यांदाच डान्सवर आधारित सिनेमात काम करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे.

आता सूत्रांच्या माहितीनुसार आणखीन एका अभिनेत्रीची वर्णी या चित्रपटात लागली आहे. ती म्हणजे अभिनेत्री डेझी शाहची आणि हीच आहे दोघात तिसरी. सलमानने "जय हो' चित्रपटातून डेझीला लॉंच केलं होतं. "जय हो' हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर अयशस्वी ठरला आणि डेझीच्या करियरलाही हवं तसं यश मिळालं नाही. डेझीनं "हेट स्टोरी 3' मध्येही काम केलं; पण त्यातही ती यशस्वी होऊ शकली नाही. रेमोच्या चित्रपटात सलमान तेरा वर्षीय मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सलमान एक प्रोफेशनल डान्सर आहे. त्यामुळे या सिनेमासाठी दबंग खानला डान्सची ट्रेनिंग घ्यावी लागणारेय. चित्रपटाच्या चित्रीकरणाला या वर्षाच्या अखेरीस सुरुवात होणारेय.