70 वर्षांनंतरची दीपिका 

भक्ती परब 
मंगळवार, 23 मे 2017

कान्समध्ये सहभागी झालेल्या दीपिका पडुकोणची एक वेगळीच अदा सध्या पाहायला मिळतेय.

कान्समध्ये सहभागी झालेल्या दीपिका पडुकोणची एक वेगळीच अदा सध्या पाहायला मिळतेय. रेड कार्पेटवर अवतरल्यावर तिने मनमोहक हास्याने उपस्थितांचं मन जिंकलं. त्यानंतर ती भारतीय संस्कृतीविषयी भरभरून बोलली; पण त्यानंतर मात्र कान्समधील एका मुलाखतीमध्ये ती चक्क आपल्या भविष्यकाळाचं चित्रण मनामध्ये करून त्यावर मनमोकळेपणाने बोलू लागली.

या वेळी ती म्हणाली, जेव्हा मी 70 वर्षांची होईन तेव्हा माझं एक छोटंसं; पण सुंदर असं घर असेल आणि खूप मुलं असतील. हे ऐकून अनेकांना कुतूहल वाटलं नसतं तरच नवल. दीपिकाला शांत अशा ठिकाणी जायचं आहे, जेव्हा ती 70 वर्षांची असेल. तिचं घर छोटंसं असलं तरी ते खूप सुंदर असेल. घराच्या सभोवती निर्सगाचं सान्निध्य असेल.

तिला खूप मुलं असतील. तिची नातवंडंही तिच्यासोबत असतील आणि ती त्या घरात सर्वांसोबत खूप पुढील उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगू शकेल. वा मस्तच... दीपिका पडुकोनची ही कल्पना तर फारच सुंदर आहे. यावर रणवीर सिंगची काय प्रतिक्रिया असेल याची उत्सुकता आता लागून राहिलीय...