दीपिका करणार कतरिनाचा पत्ता कट?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

दीपिका पदुकोणचा पहिलावहिला हॉलीवूडपट "ट्रिपल एक्‍स : द रिटर्न ऑफ झांडर केज'ची फारच हवा होती. नुकतेच त्याचे दणक्‍यात प्रदर्शनही झाले. चित्रपटाचा हिरो विन डिझेल त्यासाठी खास मुंबईत आला होता. त्याचे भारतीय संस्कृतीनुसार थाटामाटात स्वागतही झाले; मात्र भारतात चित्रपटाला म्हणावा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि दीपिकाचे फॅन्स नाराज झाले. आता ते तिच्या आगामी सिनेमाची वाट पाहताहेत; पण त्यासाठी त्यांना चांगलीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या दीपिकाकडे संजय लीला भन्साळींचा "पद्मावती' चित्रपट सोडल्यास आणखी कोणताही मोठा प्रोजक्‍ट नाही.

दीपिका पदुकोणचा पहिलावहिला हॉलीवूडपट "ट्रिपल एक्‍स : द रिटर्न ऑफ झांडर केज'ची फारच हवा होती. नुकतेच त्याचे दणक्‍यात प्रदर्शनही झाले. चित्रपटाचा हिरो विन डिझेल त्यासाठी खास मुंबईत आला होता. त्याचे भारतीय संस्कृतीनुसार थाटामाटात स्वागतही झाले; मात्र भारतात चित्रपटाला म्हणावा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि दीपिकाचे फॅन्स नाराज झाले. आता ते तिच्या आगामी सिनेमाची वाट पाहताहेत; पण त्यासाठी त्यांना चांगलीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या दीपिकाकडे संजय लीला भन्साळींचा "पद्मावती' चित्रपट सोडल्यास आणखी कोणताही मोठा प्रोजक्‍ट नाही. हॉलीवूडपटात बिझी असल्याने दरम्यानच्या काळात तिने अनेक चांगल्या ऑफर्स नाकारल्या होत्या. आता ती पुन्हा बॉलीवूडमध्ये परतलीय. एका चांगल्या चित्रपटाच्या शोधात आहे. "तनू वेडस्‌ मनू' फेम दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या शाहरूख खान स्टारर चित्रपटाकडे सध्या तिचे लक्ष लागले आहे. या चित्रपटासाठी आनंद राय यांचे पहिले प्राधान्य दीपिकाच होती; पण तिने आपल्या हॉलीवूडपटासाठी त्याला नकार दिला होता. त्यानंतर आनंद राय यांनी कतरिना कैफची निवड जवळपास निश्‍चितच केली होती; पण सूत्रांच्या माहितीनुसार आता दीपिकाने आनंद राय यांच्या चित्रपटासाठी नुकतीच स्क्रीन टेस्ट दिल्याने चर्चेला ऊत आला आहे. कतरिनाच्या हातातून दीपिका चित्रपट काढून घेणार की काय? अशी कुजबूज आतापासूनच सुरू झालीय.