देव पटेलला "लायन' चित्रपटासाठी  ऑस्करचे नामांकन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई : "स्लमडॉग मिलियनेयर'फेम अभिनेता देव पटेल याला ब्रिटिश चित्रपट "लायन'मधील भूमिकेसाठी पहिल्यांदा ऑस्कर पुरस्काराचे नामांकन जाहीर झाले आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पाच अन्य विभागांसाठी नामांकने मिळाली आहेत. 

भारतीय निवासी असणाऱ्या देव पटेलला "लायन' या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ सहअभिनेता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. कुटुंबापासून ताटातूट झालेल्या एका तरुणाची भूमिका देवने साकारली आहे. तो गुगल अर्थच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा शोध घेत असतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन गार्थ डेविसने केले आहे. याबद्दल देव पटेलने सांगितले की, ही आश्‍चर्यकारक माहिती आहे. मला विश्‍वास नाही की हे कसे घडले. गार्थ डेविस यांच्याशिवाय या चित्रपटाची कल्पना करूच शकत नाही. देव पटेलव्यतिरिक्त "लायन' चित्रपटात सनी पवार, प्रियंका बोस, दीप्ती नवल व तनिष्ठा चॅटर्जी आहेत.