नंदू माधव व देविका दफ्तरदार पहिल्यांदाच एकत्र

cinema nandu madhav
cinema nandu madhav

मुंबई : नेमक्याच तरीही प्रभावी भूमिका करण्याकडे ओढा असणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार ही नाव आवर्जून घेतली जातात. आतापर्यंत मोजक्या पण हटके चित्रपटांमध्ये दिसणारे हे दोन चतुरस्त्र कलाकार योगायतन फिल्मस् प्रस्तुत परी हूँ मैं या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच जोडीच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शिलवंत आहेत.

परी हूँ मैं या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. कौटुंबिक नाट्य असणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नंदू माधव आपल्याला या  सिनेमात कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या आईची व्यक्तिरेखा देविका दफ्तरदार साकारणार आहेत. 

नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची आहे. चित्रपटाचेछायांकन रोहन मडकईकर यांचे असून संगीत समीर साप्तीस्कर यांचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com