दिलीपकुमार यांना लिलावती हाॅस्पिटलमधून डिस्चार्ज

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना बुधवारी दुपारी लिलावती हाॅस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुत्राशयाचा त्रास होऊ लागल्याने लिलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते. 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना बुधवारी दुपारी लिलावती हाॅस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुत्राशयाचा त्रास होऊ लागल्याने लिलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते. 

दरम्यानच्या काळात त्याना डायलिसीसवर ठेवण्यात आल्याच्या बातम्याही प्रसिध्द झाल्या होत्या. पण त्यांना तशी कोणतीही ट्रिटमेंट देण्यात आली नव्हती. हाॅस्पिटलमधून आल्यानंतर त्यांना लगेच आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवता यावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर होणाऱ्या ट्रिटमेंटला ते चांगला प्रतिसाद देत होते. अखेर बुधवारी त्यांना घरी नेण्याची परवानगी देण्यात आली. दिलीपकुमार यांच्या पत्नी सायराबानू यांनी ट्विटरवरून सर्वांचे आभार मानले. या डाॅ. गोखले, डाॅ. बापट, डाॅ. शर्मा यांसह दिलीपकुमार यांचे चाहते, स्टाफ सर्वांचे त्यांनी आभार मानले.