जावेद अख्तर बदनामी प्रकरण कंगनाला भलतंच भोवतंय;वाचा सविस्तर

कंगना रनौतच्या खटला हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर दिंडोशी न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे.
Kangana Ranaut, Jawed AKhtar
Kangana Ranaut, Jawed AKhtarGoogle

दिंडोशी सत्र न्यायालयाने जावेद अख्तर (Jawed Akhtar) यांच्या बदनामीचा(Defamation) खटला हस्तांतरित करण्याच्या कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. कंगना रनौतने गीतकार जावेद अख्तर यांनी तिच्यावर दाखल केलेला मानहानीचा खटला हस्तांतरित करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम ४०८ अंतर्गत दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. वृत्तानुसार, या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीधर भोसले यांनी २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी केली आणि न्यायालयाने तिच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय ९ मार्च रोजी आदेश देणार आहे, अशी बातमी समोर येत आहे.

Kangana Ranaut, Jawed AKhtar
Video: बर्फाच्या पाण्यात विद्युतची उडी; चाहते मात्र गारठले

जानेवारीमध्ये, कंगनाने सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी एक नवीन याचिका दाखल केली होती आणि अंधेरी कोर्ट तिच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे नमूद करून तिच्या सर्व कायदेशीर कार्यवाही हस्तांतरित करण्याची मागणी तिनं केली होती. अभिनेत्रीने मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्याशी संपर्क साधून,''तिच्यावर लावलेले आरोप जामीनपात्र आहेत,तसंच उगाचच असंबंध गोष्टी जोडून हे आरोप आपल्यावर लावले आहेत,ते तसे आरोप करण्यामागचं कारणही कळत नाही आहे' असे मुद्दे त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. तिचा आरोप होता की, खटल्यापूर्वीच तिच्या प्रतिष्ठेला इजा पोहोचवण्यासाठी अंधेरी कोर्टातील काही नामवंत मंडळी आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत आहेत'.

Kangana Ranaut, Jawed AKhtar
'धकधक गर्ल' माधुरीला तिच्या 'त्या' चुकीसाठी आई आजही ओरडते

उत्तरा दाखल जावेद अख्तर यांचे वकील जय के भारद्वाज म्हणाले की,''कंगनाचा हेतू विविध याचिका दाखल करून कारवाईला उशीर करणे आणि ज्येष्ठ नागरिक असूनही अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर असलेल्या आपल्या अशिलाला त्रास देणे हा आहे''. जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये एका टेलिव्हिजन मुलाखतीत बदनामीकारक आणि निराधार टिप्पण्या केल्याबद्दल कंगना रनौत विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. अभिनेत्रीनं त्या विरोधात आपल्याला धमकी दिल्याची तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com