बिग बींबरोबर डिनर?

dinner with amitabh bachchan ?
dinner with amitabh bachchan ?

मुंबईत लाखो फॅन्स त्यांच्या स्टार्सच्या घरांबाहेर जाऊन उभे राहतात. त्यांची एक झलक मिळावी म्हणून चाहत्यांची किती धडपड सुरू असते. अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरही रोज लोक"प्रतीक्षा' करत उभे असतात; पण त्यांच्या फॅन्ससाठी एक छान वेगळीच बातमी आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जेवायची संधी आता चाहत्यांना मिळणार आहे. कशी? आणि कधी?

विचारायच्या आधी पुढे वाचा. आता एवढ्या मोठ्या माणसाला भेटायचं तर काहीतरी किंमत मोजावीच लागणार. एक शेफचा ग्रुप आहे जो "वन स्टार हाऊस पार्टी' या नावाने प्रसिद्ध आहे. तो अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यामध्ये एक रेस्टॉरंट ओपन करणार आहे. 17 ते21 जानेवारीपर्यंत प्रेक्षक येथील टेस्टी फूड खाऊ शकतील; पण त्यासाठी आपल्याकडे 8000 रुपये असणं खूप गरजेचं आहे. कारण या हॉटेलमध्ये जायचा पासच 8000रुपयांचा आहे. एवढ्या मोठ्या सेलिब्रेटीला भेटणंसोपं नाही. काय मगं तयार आहात ना! बिग बींबरोबर डिनर करायला? 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com