'पद्मावती'ची राणी पद्मिनी उद्या प्रगटणार

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती या चित्रपटाची मोठी चर्चा झाली. रणवीर सिंग, दीपिका पदुकोन, शाहीद कपूर हे तिघे या चित्रपटातून दिसणार आहेत. या चित्रपटाची पहिली झलक उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रसिकांना पाहायला मिळणार आहे. दीपिकाचे या चित्रपटातील रुप तिच्या चाहत्यांना सुखावणारे असून, या राणीची श्रीमंती आणि सौंदर्य यातून दिसेल असे कळते.

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती या चित्रपटाची मोठी चर्चा झाली. रणवीर सिंग, दीपिका पदुकोन, शाहीद कपूर हे तिघे या चित्रपटातून दिसणार आहेत. या चित्रपटाची पहिली झलक उद्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रसिकांना पाहायला मिळणार आहे. दीपिकाचे या चित्रपटातील रुप तिच्या चाहत्यांना सुखावणारे असून, या राणीची श्रीमंती आणि सौंदर्य यातून दिसेल असे कळते.

संजय लीला भन्साळी प्राॅडक्शनतर्फे दीपिकाचा रोल उद्या रिवील होणार असल्याचे कळवण्यात आले आहे. नवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज पद्मावती या चित्रपटाचाा लोगो रिवील करण्यात आला. आता दीपिका नेमक्या कोणत्या रूपात दिसणार हे मात्र उद्या सकाळीच कळणार आहे.