दिग्दर्शक प्रसाद गोखले यांचे निधन

टीम इ सकाळ
मंगळवार, 4 जुलै 2017

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर मालिकांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक प्रसाद गोखले यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. सध्या कलर्स मराठीवरील अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेचे दिग्दर्शन केले होते.

गेल्या काही दिवसांपूर्वीपासून त्यांनी काम करणे थांबवले होते. किडनीचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. पण सोमवारी अचानक ही बातमी हाती आल्याने छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे. प्रख्यात दिग्दर्शक शशांक सोळंकी यांच्याकडे ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. 