ई सकाळ: संदीप सावंत #Live : 'नदी वाहती ठेवणं ही जबाबदारी आपली!'

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

'श्वास' हा चित्रपट दिग्दर्शित केलेले दिग्दर्शक संदीप सावंत तब्बल 13 वर्षांनी आपला नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे 'नदी वाहते'. या चित्रपटाचे स्क्रिनिंग पुण्यात झालं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज संदीप खास ई सकाळच्या फेसबुक पेजवर लाईव्ह बोलते झाले.

पुणे: श्वास हा चित्रपट दिग्दर्शित केलेले दिग्दर्शक संदीप सावंत तब्बल 13 वर्षांनी आपला नवा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे 'नदी वाहते'. या चित्रपटाचे स्क्रिनिंग पुण्यात झालं. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज संदीप खास 'ई सकाळ'च्या फेसबुक पेजवर लाईव्ह बोलते झाले. लाईव्ह गप्पा मारण्याची ही त्यांची इतक्या वर्षातली पहिलीच वेळ. यावेळी त्यांनी नदी वाहाते या चित्रपटाची माहीती दिलीच. शिवाय, गेल्या 13 वर्षात श्वास या चित्रपटानंतर नेमके काय काय काम केले ही मेहनत उलगडून दाखवली. 'ई सकाळ'च्या वाचकांनीही यावेळी प्रश्न विचारले. त्यांनाही सावंत यांनी उत्तर दिली. 

फिल्म अर्काइव्ह आॅफ इंडीयाच्या प्रांगणात या गप्पा झाल्या. नदी वाहते हा चित्रपट माणसाच्या जगण्याशी संबंधित असून, गावागावांतून वाहणारी नदी जर वाहती राहीली तर माणसाचं जगणं सुसह्य होईल. ही नदी वाहती ठेवणे हे आपलं काम आहे हे सांगताना त्यांनी या चित्रपटाचं महत्त्व सांगितलं.या गप्पांमध्ये नीरजा पटवर्धन यांनीही भाग घेतला. संदीप आणि नीरजा यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

या गप्पांमध्ये गेल्या 14 वर्षांत मराठी चित्रपट कसा बदलला, श्वासनंतर चित्रपट बनवायला इतकी वर्षे का लागली, या काळात चित्रपटाचं काम कसं सुरु होतं. यांसह नदी वाहते हा चित्रपट कसा वितरीत होणार आहे आदी अनेक विषयांवर भाष्य केलं. जवळपास 40 मिनिटं या गप्पा रंगल्या. ई सकाळ्या वाचकांनीही अत्यंत समर्पक प्रश्न विचारल्यामुळे संदीप यांनी वाचकांचेही आभार मानले. यावेळी दिग्दर्शक विरेन प्रधान, कॅमेरामन संजय मेमाणे, समीक्षक गणेश मतकरी, फोटोग्राफर इंद्रजित खांबे आदी मंडळी आॅनलाईन होती.