जाहिरात करणं गरजेचं 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

"एम.एस.धोनी - द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटात प्रियंका झाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा पटानीच्या अभिनयाचं सगळीकडून खूप कौतुक झालं. त्यानंतर ती "कुंग फू योगा' सिनेमात दिसली. आता ती एका जाहिरातीत दिसणार आहे. तिला जाहिरातीत काम करणं महत्त्वाचं वाटतं. तिच्या मते मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकप्रिय कलाकारांनी जाहिरातीत काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे कलाकार प्रेक्षकांच्या चांगले लक्षात राहतात. ती सांगते की, "चित्रपट बनायला खूप कालावधी लागतो. जवळपास एका वर्षात एक चित्रपट तयार होतो. यादरम्यानच्या काळात जाहिरातीत छोटं-मोठं काम केलं पाहिजे. जेणेकरून लोक तुम्हाला विसरणार नाहीत.' 