दिव्यांका - विवेक ठरले 'नच बलिये 8' चे विजेते

टीम इ सकाळ
सोमवार, 26 जून 2017

नच बलियेचा आठवा सिझन कमालीचा गाजला. या स्पर्धेत कोणती जोडी विजेती ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर गेल्या रविवारी रंगलेल्या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया ही जोडी विजेती ठरली. 

मुंबई: नच बलियेचा आठवा सिझन कमालीचा गाजला. या स्पर्धेत कोणती जोडी विजेती ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर गेल्या रविवारी रंगलेल्या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया ही जोडी विजेती ठरली. 

या शोमध्ये सिद्धार्थ आणि तृप्ती जाधव ही जोडी असल्यामुळे या स्पर्धेत चांगली रंगत होती. प्रत्येक मराठी माणसाला जाधव जोडी जिंकावी असे वाटत होते. पण ही जोडी बाद झाली. त्यानंतर अबिगल पांडे - सनम जोहर आणि सनाया इरानी - मोहित सहगल या जोडीत चुरस होती. पण अपेक्षेनुसार दिव्यांका-विवेक यांनी बाजी मारली. तर अबिगल-सनम आणि इरानी-मोहित यांनी रनर अप घोषित करण्यात आले. 

दिव्यांका आणि विवेक यांना ट्राॅफी देऊन गौरवण्यात आले. शिवाय त्यांना 35 लाख रुपये इनाम म्हणुन मिळाले.  

टॅग्स