कपिल, देव असल्याच्या आविर्भावात राहु नकोस: सुनील ग्रोव्हर

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

लोकप्रिय विनोदी अभिनेते कपिल शर्माने त्याचा सहकलाकार सुनील ग्रोव्हरला विमान प्रवासामध्ये वाईट वागणूक दिली होती. मारहाण करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर कपिलने दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावर सुनील सविस्तर पत्राद्वारे कपिलला सणसणीत चपराक दिला आहे.

नवी दिल्ली - लोकप्रिय विनोदी अभिनेते कपिल शर्माने त्याचा सहकलाकार सुनील ग्रोव्हरला विमान प्रवासामध्ये वाईट वागणूक दिली होती. मारहाण करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यानंतर कपिलने दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावर सुनील सविस्तर पत्राद्वारे कपिलला सणसणीत चपराक दिली आहे.

सुनीलने कपिलला एक पत्र लिहिले आहे. हे पत्र त्याने ट्‌विटरवर शेअर केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, "भाई जी! होय, तू मला खूप दुखावले आहे. तुझ्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळते. केवळ एक सल्ला देतो प्राण्यांशिवाय माणसांचाही सन्मान करायला शिक. सगळेच जण तुझ्याएवढे यशस्वी नसतात. सगळेच जण तुझ्याएवढे प्रतिभावान नसतात. पण सगळेच जर तुझ्यासारखे प्रतिभावान असते तर तुला कोणी विचारले असते. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त कर.' पत्राच्या शेवटी सुनीलने लिहिले आहे की, "हा तुझा शो आहे आणि त्यातून कोणाला कधीही बाहेर काढण्याचे अधिकार तुला आहेत, याची जाणीव करून दिल्याबद्दल आभार. तू हजरजबाबी आहेस आणि तुझ्याक्षेत्रात सर्वोत्कृष्ट आहेस. मात्र देव असल्याच्या आविर्भावात राहु नकोस. काळजी घे. तुला आणखी यश आणि आणखी वलय मिळावे, यासाठी शुभेच्छा!'

या घटनांमुळे सुनील कपिलचा शो सोडून जाईल, या चर्चेला बळ मिळण्याची शक्‍यता आहे.