हे नाटक सर्वांनी पाहण्यासारखे.. 

टीम ई सकाळ
सोमवार, 5 जून 2017

बघता बघता डोंट वरी बी हॅप्पी या नाटकाने दोनशेव्या प्रयोगाकडे घोडदौड केली आहे. येत्या काही दिवसांतच हे नाटक आपली द्विशतकी टप्पा पार करेल. या निमित्ताने या नाटकातील दोन प्रमुख कलाकार म्हणजे स्पृहा जोशी आणि उमेश कामत यांच्याशी ई सकाळने फेसबुक लाईव्ह केले. त्यावेळी या नाटकाबद्दल बऱ्याच गप्पा झाल्या. काही किस्से उलगडले. त्यावेळी या नाटकातील पात्रे आजच्या काळातील असली, तरी हे नाटक सर्व पिढ्यांसाठी असल्याची माहीती स्पृहा आणि उमेश यांनी दिली. 

पुणे : बघता बघता डोंट वरी बी हॅप्पी या नाटकाने दोनशेव्या प्रयोगाकडे घोडदौड केली आहे. येत्या काही दिवसांतच हे नाटक आपली द्विशतकी टप्पा पार करेल. या निमित्ताने या नाटकातील दोन प्रमुख कलाकार म्हणजे स्पृहा जोशी आणि उमेश कामत यांच्याशी ई सकाळने फेसबुक लाईव्ह केले. त्यावेळी या नाटकाबद्दल बऱ्याच गप्पा झाल्या. काही किस्से उलगडले. त्यावेळी या नाटकातील पात्रे आजच्या काळातील असली, तरी हे नाटक सर्व पिढ्यांसाठी असल्याची माहीती स्पृहा आणि उमेश यांनी दिली. 

 

कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाबाहेर या गप्पा झाल्या. नाटकाबद्दल माहीती देताना उमेश म्हणाला, हे नाटक आता लवकरच दोनशेचा टप्पा पार करते आहे. याचे श्रेय नाट्यरसिकांना आहे. कारण त्यांना नाटक आवडले म्हणून ते चालले. याचे मुख्य कारण म्हणजे, ते विशिष्ट पिढीचे नाही. तर ते प्रत्येकाच्या घरातील नाटक आहे. हे नाटक झाल्यानंतर लोक आम्हाला भेटायला येतात, त्यावेळी लक्षात येते की त्या प्रत्येकांचे प्रश्‍न या नाटकात आलेले असतात. लेखक मिहीर राजदा याच्या लिखाणाची ती कमाल असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. 

या नाटकाचा आपला असा श्रोतावर्ग महाराष्ट्रात तर आहेच. याशिवाय तो परदेशातही आहे. म्हणूनच या नाटकाचे प्रयोग सिंगापूर, दुबई या ठिकाणीही झाले आहेत. तिथल्या अनुभवाबद्दल बोलताना स्पृहा म्हणाली, आम्हाला परदेशात नेमका कसा प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता होती. पण तिथल्या लोकांनाही हे नाटक आवडले. याबद्दल तिने सर्व रसिकांचे आभार मानले. 

डोंट वरी बी हॅप्पी या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले असून सोनल प्रॉडक्‍शनची ही निर्मिती आहे. या शिवाय, व्यक्तिगत आयुष्यातील अनेक किस्से, नाटक करताना एकमेकांसोबत असलेले टायमिंग यावर बोलता बोलता चाहत्यांच्या प्रश्‍नांनाही त्यांनी उत्तरे दिली.