डक टेल्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

मुंबई - 90च्या दशकात सुरु झालेल्या काही कार्टून सीरीज चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यातही डिस्नेच्या कार्टून सीरीजला तर बच्चेकंपनीची खास पसंती असायची. त्यातलेच एक अत्यंत लोकप्रिय झालेले कार्टून म्हणजे डक टेल्स. 90च्या दशकात ज्यांनी ही सीरीज पाहिली आहे त्यांच्यासाठी एक खूशखबर आहे. कारण ''जिंदगी तूफानी है.. जहां है डक वर्ल्ड'' असे म्हणत डक टेल्स पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. 

डिस्ने टेलेव्हिजन ऍनिमेशन न्यूजने या बद्दलचा एक व्हिडिओ टिझर नुकताच प्रसिद्ध केला आहे. 

पैशांमध्ये पोहणारे अंकल स्क्रूज आजही सगळ्यांच्या लक्षात असतील ना...? हेच अंकल स्क्रूज आणि धम्माल मस्ती करणारे ह्युई, ड्युई आणि ल्युई 2017मध्ये आपल्या भेटीला येणार आहेत. या सीरीजमधल्या मुख्य पात्रांबरोबरच लॉंचपॅड मॅक्वॅक, फ्लिंटहार्ट आणि बिगल बॉईज हे देखील बघायला मिळणार आहेत. 

या सीरीजचा पहिला सिझन 21 एपिसोड्सचा असणार आहे. जानेवारीमध्ये सुरु होणाऱ्या या सिझनच्या ट्रेलरविषयी देखील अनेकांना उत्सुकता आहे. 

व्हिडिओ सौजन्य - Disney Television Animation News youtube

सकाळ व्हिडिओ

मनोरंजन

मुंबई : टिना दत्ता हे नाव हिंदीवरच्या छोट्या पडद्याला नवं नाही. उतरन मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली. टिना सोशल मिडीयावरही बरीच...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई : ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात हे योग्यचं आहे. नवे खमंग, चविष्ट, खुशखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. खरतर...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई : आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही या कथासूत्रावर सुरु झालेली मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहोचली आहे. शांभवी आणि...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017