बॅडमॅन आणि हिरोसुद्धा मीच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

‘बॅडमॅन’ या पहिल्या मॉक्‍युमेंटरीमधून गुलशन ग्रोवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून जाणून घेतलंय या नव्या प्रयोगाबद्दल...
 

‘बॅडमॅन’ या पहिल्या मॉक्‍युमेंटरीमधून गुलशन ग्रोवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून जाणून घेतलंय या नव्या प्रयोगाबद्दल...
 

‘बॅडमॅन’ हा एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग आहे. ही एक फीचर फिल्म आहे. ज्याला मॉक्‍युमेंटरी म्हणता येईल. भारतात या आधी अशा प्रकारचा प्रयोग झालेला नाही. तसेच वेब ॲपच्या प्रेक्षकांसाठी तयार झालेला हा पहिला चित्रपट आहे जो फक्त वेब ॲपवर प्रदर्शित होणार आहे, कोणत्याही चित्रपटगृहात नाही. सध्या वेब सीरिजचा जमाना आहे; पण वेब ॲपवर एकतर सीरिज बनवल्या जातात किंवा जुने चित्रपट दाखविले जातात; पण हा अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. या मॉक्‍युमेंटरीमध्ये मी, ऋषी कपूर, मनीषा कोईराला, महेश भट्ट, फराह खान, सुजित सरकार, चंकी पांडे, सुजॉय घोष, जॅकी श्रॉफ हे कलाकार काम करत आहोत. गुलशन यांना मॉक्‍युमेंटरी फिल्म म्हणजे काय? हे विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही जेवढे कलाकार या चित्रपटात काम करत आहोत ते आम्ही आमच्या नावानेच प्रेक्षकांना पडद्यावर दिसणार आहोत; पण जी कथा आम्ही मांडतोय ती काल्पनिक आहे. माझं नाव गुलशन ग्रोवरच आहे. मनीषाचं नाव मनीषाच आहे. पहिल्यांदाच एका खलनायकाचं नावच त्या चित्रपटाला देण्यात आलेलं आहे. माझी बॅडमॅन ही इमेज गाजली होती आणि त्याच इमेजच्या नावाने हा चित्रपट आला आहे. तसेच ‘बॅडमॅन’ हा या चित्रपटाचा हिरो आहे. ‘हा चित्रपट करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. कारण या चित्रपटात जो ह्युमर आहे तो माझ्यावर करण्यात आला आहे. एक खलनायक जो हिरो बनण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याच्यावर सगळा विनोद करण्यात आलेला आहे. मी या चित्रपटात स्वत:चीच भूमिका करत आहे. या चित्रपटात एक खलनायक हिरो बनण्याचा निर्णय घेतो, त्यानंतर काय काय विनोदी घटना घडतात? ते म्हणजे ही मॉक्‍युमेंट्री. ही मॉक्‍युमेंट्री परदेशात अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये दाखविली जात आहे. नुकतीच ती ३९ व्या मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखविली गेली. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ही मॉक्‍युमेंट्री चार भागांमध्ये ‘वूट’ या ॲपवर उपलब्ध आहे.

शब्दांकन - चिन्मयी खरे

मनोरंजन

मुंबई : स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' मालिकेच्या टीमनं नुकताच कोल्हापूर दौरा केला. त्यात निवेदिता सराफ यांच्यासह सुपर्णा श्याम आणि...

05.03 PM

मुंबई : सेन्साॅर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आता दरवेळी नवनवे खेळ खेळायला सुरूवात केली आहे. जाणूनबुजून चर्चेत...

04.24 PM

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून 'परमाणू.. द स्टोरी आॅफ पोखरण' हा चित्रपट सतत चर्चेत आहे. कोणी कल्पनाही करू शकणार नाही अशा...

03.36 PM