'इंदू सरकार'विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

संजय गांधी हे आपले वडील असल्याचा दावा करणाऱ्या प्रियासिंह पॉल यांनी या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली होती. देशहित आणि माहीत करून घेण्याचा अधिकार हा एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेपेक्षा वरचे आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळातील कथानक असलेला 'इंदू सरकार' चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाचे खेळ रोखावे यासाठी एका महिलेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळून लावली आहे. 

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी 1975 ते 1977 या दरम्यान आणीबाणी जाहीर केली होती. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित इंदू सरकार या चित्रपटामध्ये त्या काळातील कथानक दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात आक्षेपार्ह व इंदिरा गांधी यांची मानहानी करणारे चित्रण केल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेकांनी त्याचा निषेध नोंदवत विरोध दर्शवला आहे. 

"चित्रपट हे कायद्याच्या चौकटीतील एक कलात्मक अभिव्यक्तीचे प्रदर्शन असते. इंदू सरकार हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखणे समर्थनीय नाही. हा चित्रपट म्हणजे सबळ पुराव्यांसह असणारा दस्तावेज नव्हे," असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, एखाद्या चित्रपटात नाट्यमयता आणि अतिश्योक्ती असावी लागते, असेही न्यायालयाने सांगितले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: