सरस्वती, घाडगे & सून या मालिकांमध्ये मध्ये होणार गणपती बाप्पाचं आगमन !

colors marathi
colors marathi

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे कारण एकच आपल्या सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पा याचे लवकरच आगमन होणार आहे. सगळीकडे गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या 'सरस्वती', 'घाडगे & सून' आणि 'कॉमेडीची GST एक्सप्रेस' या कार्यक्रमांमध्ये देखील गणपतीचे आगमन होणार आहे. गणेशाच्या आगमनाने सगळी संकंट दूर होऊन जाउ दे, सगळ्यांच आयुष्य टेंशन फ्री होऊ दे हेचं मागण यंदा गणरायापुढे असणार आहे. भैरवकर आणि घाडगे परिवारामध्ये गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु होत आहे. 

'सरस्वती' मालिकेमध्ये भैरव करांच्या वाड्यावर गणेशाचे आगमन होणार असून यावेळेसच्या गणेश चतुर्थीमध्ये काही विशेष असणार आहे. “एक गावं एक गणपती” असे आयोजन करण्यात येणार आहे. देविका आणि सरू म्हणजेच सरस्वती हरतालिकेची पूजा करणार आहेत. विद्युल सरस्वतची हि पूजा कशी असफल करण्याचा तसेच तिच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तिचा उपवास मोडण्याचा तसेच तिची पूजा कशी वेळेत होणार नाही याचा प्रयत्न ती करणार आहे. या सगळ्या अडचणीवर मात करून कशी सरस्वती हरतालिकेची पूजा करेल ? कसे विद्युलचे हे कट कारस्थान उलटून लावेल हे बघणे रंजक असणार आहे. गावामध्ये गणपतीचे जल्लोषात आगमन होते, पण या गणेशोत्सवामध्ये सरस्वतीवर कोणते नवे संकंट येणार आहे, त्यामधून ती कशी मार्ग काढणार आहे ? राघव या मध्ये तिला काही मदत करणार का ? हे बघण्यासाठी नक्की बघा 'सरस्वती'.

नुकत्याच सुरु झालेल्या 'घाडगे & सून' या मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन होणार आहे. घाडगे परिवाराने गणेशाच्या मूर्तीची स्थापना पारंपरिक पद्धतीने केली. गणपती आगमनाच्या शुभमुहूर्तावर माईना आणि घाडगे परिवाराला आवडलेली अमृता पहील्यांदाच घाडगेच्या घरी येणार आहे आणि दुसरीकडे अक्षयचे जिच्यावर प्रेम आहे ती कियारा देखील येणार आहे या दोघी माईसमोर आल्यावर त्यावर माईची काय प्रतिक्रिया असेल हे बघणे रंजक असणार आहे. गणरायाकडे सगळेच काहीना काही मागण मागतात त्याचप्रमाणे घाडगे परिवारातील प्रत्येकाने बाप्पाकडे मागण मागितल आहे आता कोणाचे मागण बाप्पा ऐकेल, कोणाची इच्छा पूर्ण होईल हे जाणून घेण्यासाठी बघत रहा 'घाडगे & सून'.

 'कॉमेडीची GST एक्सप्रेस' या कार्यक्रमाच्या गणेशचतुर्थी विशेष भागाची सुरुवात गणपती नमन सादर होणार आहे तसेच महाराष्ट्राचा लाडका आणि कार्यक्रमाचा प्रथम प्रेक्षक अवधूत गुप्ते याने त्याचे सुप्रसिध्द गाणे देखील म्हंटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com