रिव्ह्यू #Live : 'रिंगण' बाप-लेकाची अलवार गोष्ट

टीम ई सकाळ
शुक्रवार, 30 जून 2017

गेल्या वर्षीपासून चर्चेत असलेला रिंगण हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे. या सिनेमाला गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता तमाम मराठी सिनेप्रेमी जनतेला लागून राहीली होती. आज झालेल्या लाईव्ह रिव्ह्यूमध्ये या चित्रपटाने मिळवले 4 चीअर्स.

पुणे : गेल्या वर्षीपासून चर्चेत असलेला 'रिंगण' हा सिनेमा अखेर रिलीज झाला आहे. या सिनेमाला गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता तमाम मराठीसिनेप्रेमी जनतेला लागून राहीली होती. आज झालेल्या लाईव्ह रिव्ह्यूमध्ये या चित्रपटाने मिळवले 4 चीअर्स.

मकरंद माने या दिग्दर्शकाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्याला जी गोष्ट मांडायची आहे, ती त्याने अत्यंत प्रामाणिकपणे मांडली आहे. या गोष्टीतून बाप आणि मुलाचं नातं अधोरेखित होतं. शिवाय, समाजातल्या अनेक स्तरांना तो स्पर्श करतो. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला की हा सिनेमा समजायला जड आहे की काय असे वाटू शकतं. पण तसं नाही. एक साधी सरळ गोष्ट मांडण्याचा यशस्वी प्रयत्न या टीमने केला आहे.  

सिटीप्राईट कोथरूड इथून या सिनेमाचा लाईव्ह रिव्ह्यू केला. विशेष बाब अशी की या सिनेमातील मुख्य कलाकार शशांक शेंडे आणि दिग्दर्शक मकरंद माने यांच्या उपस्थितीत हा रिव्ह्यू झाला. यात रिव्ह्यू तर झालाच. पण या सिनेमातील अनेक प्रसंग, सिनेमा बनवण्यामागची प्रक्रीया, काही दृश्य चित्रित का केली, कशी केली या मागील हकीकतही त्यांनी 'ई सकाळ'च्या या प्लॅटफाॅर्मवरून सांगितली. 

 व्हिडिओ रिव्ह्यू :

कलाकार दिग्दर्शकाच्या उपस्थितीत रिव्ह्यू करण्याचा नव्याने सुरू झालेला हा प्रयत्न स्तुत्य असल्याची पावतीही या कलाकारांनी दिली. संपूर्ण रिव्ह्यू पाहण्यासाठी दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करता येईल. ई सकाळने या चित्रपटाला दिले 4 चीअर्स. 

■ 'ई सकाळ'वरील महत्वाच्या ताज्या बातम्या 
बलात्काराचा आरोप करत जमावाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये व्हॉटसऍपचे हॅकिंग; दक्षतेचे आवाहन
सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण
वारीद्वारे केली अपंगत्वावर मात
परभणी: पत्नीची पेटवून घेऊन तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याणमध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे; वाहतुकीची कोंडी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार
'बीफ' बाळगल्याच्या आरोपाखाली जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमधील सोनसाळखीची चोरी सीसीटीव्हीत कैद (Video)
यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू